शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल
2
'काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा', संजय राऊतांचे मोठे विधान
3
सोनं, घर आणि... अनुपम मित्तल यांनी सांगितला श्रीमंतीचा कानमंत्र; म्हणाले तुम्हीही होऊ शकता अब्जाधीश
4
Ranji Trophy: बिग सरप्राइज! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या खांद्यावर उप-कर्णधारपदाची जबाबदारी
5
लढाई थांबवा, भारत फायदा उठवेल ; अफगाणिस्तानसोबत झालेल्या लढाईवरून पाकिस्तानमध्ये वेगळीच चर्चा
6
धनत्रयोदशीपर्यंत १.३० लाखांपर्यंत जाऊ शकतं सोनं, पुढील वर्षी दीड लाखांचा टप्पा करणार पार, काय म्हणताहेत एक्सपर्ट?
7
Google Maps ला टक्कर देणार 'मेड इन इंडिया' App; 3D नेव्हिगेशनसह मिळतात अनेक फीचर्स, पाहा...
8
IND vs WI : जॉन कॅम्पबेलची विक्रमी सेंच्युरी! जे लाराला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
9
इस्त्रायल युद्ध थंडावले, पण गाझात अंतर्गत संघर्ष पेटला! हमास-दुघमुश टोळीच्या लढ्यात २७ ठार
10
धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक
11
कारचा किरकोळ अपघात झालाय? लगेच विमा क्लेम करू नका! अन्यथा 'या' मोठ्या फायद्याला मुकाल
12
दिवाळीत 'लक्ष्मी' घरी आणायचीय? मग पाहा बाजारातील 'टॉप ५' स्कूटर! पेट्रोल की इलेक्ट्रिक? कोण देतंय बेस्ट डील?
13
मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार; पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात तांत्रिक बिघाड
14
Vastu Shastra: घराच्या 'या' दिशेला किचन? गृहिणीच्या आणि कुटुंबीयांच्या तब्येतीवर होऊ शकतो परिणाम!
15
किसान क्रेडिट कार्डाचं लोन फेडलं गेलं नाही तर काय होतं? जमीन जाऊ शकते का, पाहा काय आहे नियम?
16
Video: 'हा तुमचा देश आहे; असं नका करू', रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या मुलांना रशियन महिलेनं फटकारलं
17
बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद, राबडी, तेजस्वी यादवांना धक्का; IRCTC घोटाळ्यात आरोप निश्चित झाले...
18
ऑनस्क्रीन 'सासऱ्या'साठी रितेश देशमुखची धावपळ! विद्याधर जोशी आजारी असताना स्वतः हॉस्पिटलमध्ये पोहोचला; अन् केलं असं काही...
19
मंगळ पुष्य योग: मंगळवार १४ ऑक्टोबर पुष्य नक्षत्र योग: 'या' मुहूर्तावर करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
20
धडाम्! शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे २६ लाख गुंतवणूकदार पडले बाहेर, 'या' प्लॅटफॉर्म्सना मोठा फटका

ज्या भीतीने पक्ष सोडला, ती कारवाई अखेर झालीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2021 06:37 IST

Chitra Wagh, Pooja Chavan: चित्रा वाघ यांच्या पतीविरुद्धच्या कारवाईला राजकीय रंग; सरकारविरुद्ध राहिल्याचा फटका

- जमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीतून 'आऊटगोईंग' केल्याचा मोठा फटका ज्या नेत्यांना बसला, त्यात आता चित्रा वाघ यांचे नावही ठळकपणे घेतले जाऊ लागले आहे. जी भीती दाखवून त्यांना तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ज्या पक्षातून बाहेर काढले, त्याच पक्षाकडे गृह विभागाची धुरा असताना त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची नामुष्की त्यांना सहन करावी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

किशोर वाघ यांना साडेचार वर्षांपूर्वी एसीबीने अटक केली तेव्हा आणि आता बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा गुन्हा दाखल झाला. यावेळीही चित्रा वाघ या विरोधीपक्षात आहेत. मात्र तेव्हाच्या व आताच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची झालेली अदलाबदल त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरल्याचे सांगितले जात आहे.मागील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यात महिलाप्रदेशाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ यांचाही समावेश होता. त्या पक्षांतरात देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार प्रसाद लाडयांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार यांनी भाजपच्या सरकारकडून पतीवरील एसीबीच्या कारवाई टाळण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे चित्रा वाघ यांनी आपल्याला सांगितल्याचे स्पष्ट केले होते.

पूर्वाश्रमीच्यापक्षावर टीका विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या चाणक्यनीतीमुळे अभूतपूर्व राजकीय नाट्य घडून महाविकास आघाडी सत्तेत आली आणि सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला विरोधात बसावे लागले. त्यामुळे चित्रा वाघ यांनाही विरोधात राहावे लागले. ५ जुलै २०१६ रोजी चार लाखांची लाच घेतल्याप्रकरणी किशोर वाघ यांना अटक करण्यात आली, तेव्हा चित्रा वाघ यांनी राजकीय सूडबुद्धीने पतीवर कारवाई केल्याचा आरोप केला होता. साडेचार वर्षांनंतर त्यांच्या पतीवर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतरही त्यांची तीच प्रतिक्रिया आहे. मात्र त्यावेळी ज्या पक्षावर त्या तोफ डागत होत्या, आज त्याच पक्षाच्या व्यासपीठावरून त्या आपल्या पूर्वाश्रमीच्या पक्षावर टीका करीत आहेत.

टॅग्स :Chitra Waghचित्रा वाघNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाPooja Chavanपूजा चव्हाण