शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

पॉकेट चोरी उघड केल्याने केला बालकाचा दगडाने ठेचुन खून; अल्पवयीन आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:21 PM

पॉकेट चोरीची घटना उघडकीस आणल्याचा राग मनात धरून एका ७ वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना समोर आली.

जिंतूर (परभणी ) : पॉकेट चोरीची घटना उघडकीस आणल्याचा राग मनात धरून एका ७ वर्षीय बालकाचा खून केल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणील आरोपीस पोलिसांनी २४ तासात अटक केली असून तो अल्पवयीन आहे. युवराज जाधव (७) असे मृत बालकाचे नाव असून तो  शिवाजीनगर भागात राहत असे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, युवराज जाधव याचा गुरुवारी शहराच्या बाहेर मृतदेह आढळून आला होता. युवराजचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याने याबाबत शहरात उलटसुलट चर्चा होत्या. याप्रकरणी युवराजच्या वडिलांनी मुलाचा खून झाल्याचा दावा करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. यानंतर गुरुवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर, पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले, उप निरीक्षक सुरेश नरवडे, सुनील अवसारमोल यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. 

मयत युवराज दिवसभर कोठे आणि कोणासोबत होता याचा तपास सुरु झाला. यावेळी त्याच्या घराजवळ असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो एका मुलासोबत दिसला. माहिती घेतली असता तो युवराजच्या मोठ्या भावाचा मित्र असल्याचे लक्षात आले. यानंतर आज सकाळी ८ वाजता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. आरोपी हा विधीसंघर्षग्रस्त असून त्याने या पूर्वीसुद्धा युवराजला मारण्याचे प्रयत्न केले असल्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणिस सय्यद, आर. आर. जगाडे, पोलीस कॉन्स्टेबल संगीता वाघमारे, राजकुमार पूडगे आदी कर्मचाऱ्यांनी तपासात सहभाग घेतला.  

चोरी उघड केल्याने संपवलेआरोपीने सांगिलते की, मागीलवर्षी लग्नात एकाचे पैस्याचे पॉकेट मी उचलताना युवराजने पाहिले होते. यानंतर त्याने याची माहिती पॉकेटवाल्याला दिली. यावरून मला बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे मी युवराजला संपविण्याचे ठरवले. त्यासाठी तीन चार वेळेस प्रयत्न केले. मात्र,यश आले नाही. यानंतर मी युवराजच्या मोठ्या भावासोबत मैत्री केली. चांगली ओळख वाढल्यानंतर माझ्यावर कोणी शंका घेणार नाही हे मला माहित होते. गुरुवारी रात्री मी त्याला खेळण्यासाठी दूर घेऊन गेलो आणि तेथेच त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. त्या रात्री मी घरी आलो नाही तर बाहेरच निर्जनस्थळी झोपलो.   

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणीPoliceपोलिस