Child killed when return for kindergarten | बालवाडीतून परतणाऱ्या बालिकेचा दगडाने ठेचून खून
बालवाडीतून परतणाऱ्या बालिकेचा दगडाने ठेचून खून

कळमेश्वर: बालवाडीतून परतणाऱ्या बालिकेचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. नागपूरच्या कळमेश्वरभागात ही घटना घडली. वय वर्षे 5, असलेल्या चिमुकली रा. लिंगा, ता. कळमेश्वर ही शुक्रवारी लिंगा येथील बालवाडीत नेहमीप्रमाणे गेली होती. ती सायंकाळी घरी परत न आल्याने कुटुंबियांना शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. यामुळे हरवल्य़ाची तक्रार कळमेश्वर पोलीस ठाण्यात नोंदविली होती. 


पोलीस व गावातील तरुण तिचा शोध घेत असता तिचा मृतदेह गावालगतच्या संजय भारती, रा. नागपूर यांच्या तुरीच्या शेतात आढळून आला. तिच्या डोक्यावर दगडाने वार केल्याच्या जखमा होत्या. अंगातील टी शर्टचा भाग तोंडात अडकला होता. शांताराम धुर्वे ला दोन पत्नी असून ही पहिल्या पत्नीची मुलगी होय. या चिमुकलीस एक सख्खी बहीण आहे. दुसऱ्या पत्नीला एक मुलगा व एक मुलगी आहे. तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट होते, अशी माहिती ठाणेदार मारुती मुलूक यांनी दिली.

Web Title: Child killed when return for kindergarten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.