वडिलांनी कॉलेजला जाण्यासाठी बाईक न दिल्याने मुलाने घेतले पेटवून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 14:20 IST2019-11-15T12:56:57+5:302019-11-15T14:20:37+5:30

कळंबोलीतील सुधागड शाळेतील एका विद्यार्थ्यांने स्वत:ला पेटवून घेतले आहे.

Child attempted to suicide In Kalamboli | वडिलांनी कॉलेजला जाण्यासाठी बाईक न दिल्याने मुलाने घेतले पेटवून 

वडिलांनी कॉलेजला जाण्यासाठी बाईक न दिल्याने मुलाने घेतले पेटवून 

नवी मुंबई  - कळंबोलीतील सुधागड शाळेतील एका विद्यार्थ्यांने स्वत:ला पेटवून घेतले आहे. शिवम दीपक जाधव असे या मुलाचे नाव आहे. स्वत:ला पेटवून घेतल्याने शिवम हा मोठ्या प्रमाणावर भाजला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

शिवमचे वडील मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. वडिलांनी काँलेजला जाण्यासाठी बाईक न दिल्याने शिवम हा चिडला होता. त्यानंतर रागाच्या भारातच त्याने स्वत:ला पेटवून घेतले. दरम्यान, शिवम हा मोठ्या प्रमाणावर भाजला असून, त्याला उपचारांसाठी ऐरोली येथील बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कळंबोली पोलीस अधिक तपास करत आहेत. 

वडिलांनी बाईक देण्यास नकार दिल्यानंतर रागारागात शाळेत आला. तेथे वर्गात न जाता त्याने स्वत:ला बाथरूममध्ये कोंडून घेत दार बंद करून घेतले. त्यानंतर स्वत:ला पेटवून घेतले. आगीमध्ये होरपळत तो बाहेर आला त्यानंतर शिक्षकांनी आग विझवून त्याला रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 

Web Title: Child attempted to suicide In Kalamboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.