शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
3
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
4
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
5
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
6
Eknath Shinde: ‘बाळासाहेब हे एकच ब्रँड; स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्यांचा बँड वाजवणार' एकनाथ शिंदेंचा टोला
7
रणवीर सिंहचा 'धुरंधर' सिनेमा दोन भागात येणार? तगड्या क्लायमॅक्ससह मेकर्सचा नवीन प्लॅन
8
आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
9
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
10
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
11
CNG Crisis: ‘सीएनजी’ची बोंब, हजारो वाहने रस्त्यावरून गायब, प्रवाशांचे प्रचंड हाल!
12
मदीना बस अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू; नातेवाईक म्हणाले- अल्लाहने त्यांच्या नशिबात...
13
सौदीचे प्रिन्स दौऱ्यावर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; दिलं मोठं 'गिफ्ट'
14
Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा
15
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
16
IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’
17
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
18
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
20
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:46 IST

या चोरीच्या नेटवर्कमधील मास्टरमाईंड जयसिंहशिवाय २ साथीदार, ३ बाईक खरेदीदार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

कोरबा - ही कहाणी आहे अशा चोराची, जो मागील १० वर्षापासून घरातून गायब होता. तो जंगलात राहायचा. जसा तो बाहेर यायचा, बाईक चोरी करायचा. त्यानंतर  पुन्हा जंगलात जाऊन लपायचा. स्वत:ला श्रीमंत असल्याचं भासवत त्याने ६ गर्लफ्रेंडही बनवल्या होत्या. मात्र आता छत्तीसगडच्या कोरबा पोलिसांनी त्याला अटक करून संपूर्ण चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

या चोराचं नाव जयसिंह पटेल असं आहे. माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पोलिसांना खदान येथून रोलर चोरी झाल्याची तक्रार मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या तपासात एक व्यक्ती खदानीजवळील जंगलात झाडीझुडपात झोपडी बनवून राहत असल्याचं पुढे आले. तपासात युवकाने आपले नाव जयसिंह पटेल असल्याचं सांगितले. ना त्याच्याकडे आधार कार्ड होते, ना कुठलेही अन्य कागदपत्रे होती. पोलिसांनी त्याची कसून चौकशी सुरू केली.

या चौकशीत जयसिंहने खुलासा केला की, मी माझ्या २ साथीदारांसोबत मिळून बाईक चोरीचं नेटवर्क उभे केले होते. हे लोक आधी रेकी करायचे, त्यानंतर संधी मिळताच बाईक चोरी करत होते. चोरी केलेली बाईक स्वस्त दरात विविध खरेदीदारांना विकायचे. जयसिंहने खदान येथील रोलर चोरीसोबतच दीपका, सर्वमंगला चौकी यासह इतर अनेक ठिकाणी चोरीच्या घटना केल्याचे उघड झाले. तो त्याच्या कुटुंबापासून मागील १० वर्षापासून गायब आहे. त्याचा मृत्यू झालाय असं घरच्यांना वाटत होते. 

पोलीस अधिकारी काय बोलले?

या चोरीच्या नेटवर्कमधील मास्टरमाईंड जयसिंहशिवाय २ साथीदार, ३ बाईक खरेदीदार यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींमध्ये अनस खान, शिवचरण, रामप्रसाद, लालजी यादव, इमरान अंसारी यांचा समावेश आहे. या टोळीकडून एकूण १४ चोरीच्या बाईक जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस या चोरांपासून अनेक काही धागेदोरे मिळतायेत का याचा शोध घेत आहेत. अटकेतील आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. पोलीस या टोळीतील नेटवर्कचा पर्दाफाश करत आणखी किती जण यात सहभागी आहेत याचा शोध घेत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Forest Dweller, Boasting Wealth, Arrested for Bike Theft Ring

Web Summary : A man living in the forest, posing as rich, was arrested for running a bike theft ring. He had six girlfriends. Police recovered 14 stolen bikes and arrested his accomplices. He was missing for 10 years.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी