शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, कुटुंबीयांची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 11:59 IST

Crime News : अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

कोरबा - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची दगडकाठ्यांनी मारहाण करत अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. तसेच तिच्या कुटुंबीयांची देखील हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. 

कोरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेमरू पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गढुपरोदा गावात ही घटना घडली. 29 जानेवारी घडलेल्या या घटनेची माहिती मंगळवारी समोर आली. त्यानंतर या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. संतराम मझवार (45), अब्दुल जब्बार (29), अनिल कुमार सारथी (20), परदेसी राम पनिका (35), आनंद राम पनिका (25) आणि उमाशंकर यादव (21) अशी आरोपींची नावं आहेत. हे सर्व आरोपी सतरेंगा गावचे रहिवासी आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मझवार 29 जानेवारी रोजी 16 वर्षीय मुलगी, तिचे वडील आणि त्यांची चार वर्षांची नात यांना मोटारसायकलवर त्यांच्या घरी सोडण्यासाठी निघाला होता. मात्र रस्त्यातच त्याने कोरइ गावाजवळ थांबून मद्य प्राशन केलं. त्याला इतर आरोपींचीही सोबत मिळाली. त्यानंतर आरोपींनी तीनही पीडित व्यक्तींना गढुपरोदाजवळच्याच जंगलात नेलं. मझवार आणि इतर आरोपींनी 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर तिघांवरही दगड-काठ्यांनी हल्ला करत त्यांना जंगलात फेकून दिलं आणि घटनास्थळावरून ते पसार झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

माणुसकीला काळीमा! 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी केला बलात्कार

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच मन हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. एका 15 वर्षीय मुलीवर सलग 5 महिने तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीवर गेल्या पाच महिन्यांपासून बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि तस्करी केल्याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या चिक्कमंगळुरूमध्ये ही घटना घडली असून आरोपींमध्ये मुलीच्या मावशीचाही समावेश आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीMurderखूनPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगड