मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्नी त्याला धमकावत आहे. ती त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे, म्हणून आता ती त्याच्यासोबत राहणार नाही. ती तिच्या सासरच्या घरी परत येणार नाही. जर त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर ती त्याला जीवे मारण्याची धमकी देते असं पतीने म्हटलं आहे.
ओरछा रोड पोलीस स्टेशन परिसरातील भगवंतपुरा गावात ही घटना आहे. येथे राहणारे विनोद अहिरवार याने पोलीस अधीक्षक कार्यालयात एक तक्रार केली आहे, ज्यामध्ये त्याने त्याची पत्नी गोमती अहिरवारवर गंभीर आरोप केले आहेत. ज्या पत्नीला कठोर परिश्रम करून शिकवलं ती आता सासरच्यांना सोडून तिच्या माहेरी गेली आहे. ती सासरच्या घरी परत येऊ इच्छित नाही. ती जीवे मारण्याची धमकी देखील देत आहे.
विनोद अहिरवार याने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२३ मध्ये माझं गोमती अहिरवारशी लग्न झालं. त्यावेळी गोमती फक्त १२ वी पर्यंतच शिकली होती. मी स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हतो. तरीही मी माझ्या पत्नीला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या पत्नीच्या शिक्षणासाठी प्रत्येक पैशाची बचत केली. दिवसरात्र मेहनत करून मी गोमतीला उच्च शिक्षण दिलं, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल आणि भविष्य चांगलं होऊ शकेल.
शिक्षण घेतल्यानंतर गोमतीच्या वागण्यात अचानक बदल झाला. विनोदचा आरोप आहे की, त्याची पत्नी आता त्यांच्यासोबत राहू इच्छित नाही आणि सतत त्याच्यापासून अंतर ठेवत आहे. गोमती म्हणते की विनोद सुंदर नाही आणि गोमती स्वतः खूप सुंदर आहे, म्हणून ती आता तिच्या सासरच्या घरी परत येणार नाही आणि विनोदसोबत तिचे आयुष्य घालवू इच्छित नाही.