शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बागेश्वर धाममध्ये अर्ज करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला; महिन्यात चौथी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:29 IST

मध्यप्रदेशमधील छतरपूर येथील बागेश्वर धाममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

मध्यप्रदेशमधील छतरपूर येथील बागेश्वर धाममधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बागेश्वर धाम येथे अर्ज करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आली. मागील एक महिन्यात बागेश्वर धाममध्ये चार मृतदेह सापडले. मंगळवारी रात्री उशिरा ज्या मध्यमवयीन व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता, त्या व्यक्तीचा मृतदेह बागेश्वर धाम येथे दर्शनासाठी व बागेश्वर धाम दरबारात अर्ज करण्यासाठी आला होता, असं सांगण्यात येत आहे. महिन्यात चार मृतदेह सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. 

आत्महत्येची धमकी अन् तरुणीचे व्हिडीओ व्हायरल, इंस्टाग्रामवर झाली होती ओळख

मिळालेल्या माहितीनुसार, तो व्यक्ती बागेश्वर धाम येथे दर्शनासाठी आला होता.तो मृतदेह बागेश्वर धामच्या बायपास रोडवर आढळून आला. ही माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली. रात्री उशिरा मृतदेह सापडल्याने स्थानिक पोलिसांमध्ये घबराट पसरली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या स्थानिक बामिठा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. ज्या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे तो मूळचा मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १ महिन्यात बागेश्वर धाममध्ये चौथा मृतदेह सापडला आहे.

यापूर्वी १७ जून रोजी गाडा गावात असलेल्या बागेश्वर धाममध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहावर कपडे नव्हते. त्यावेळी त्याची ओळखही पटू शकली नाही. यापूर्वी ११ जून २०२३ रोजी बागेश्वर धाममध्येही एक मृतदेह सापडला होता. दिल्लीहून आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह बागेश्वर धामजवळील गावात आढळून आला. बागेश्वर धाममध्ये सातत्याने मृतदेह सापडत असल्याने पोलिसही बुचकळ्यात पडले आहेत. 

बागेश्वर धामच्या सुरक्षेबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. मंगळवारी मृतदेह सापडण्यापूर्वीच एक मुस्लीम तरुण बागेश्वर धाम आवारात चाकू घेऊन घुसला होता. तो निर्भयपणे प्रदक्षिणा मार्गावर फिरत होता. शस्त्रधारी तरुणाला पाहून तेथे उपस्थित भाविकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. याची माहिती तातडीने स्थानिक पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला ताब्यात घेतले.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस