शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मद्य तस्करी : चेन्नई एक्स्प्रेसमध्ये दारूच्या २१२ बॉटल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 23:27 IST

जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमधून होणारी मद्यतस्करी लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने पकडली असून, आरक्षित कोचमधून दारूच्या २१२ बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांची कामगिरी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमधून होणारी मद्यतस्करी लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने पकडली असून, आरक्षित कोचमधून दारूच्या २१२ बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत.रेल्वेगाडी क्रमांक १२९६८ जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसच्या एस ११ कोचमधून दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतील अमोल हिंगणे, रोशन अली यांना मिळाली. त्यामुळे ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येण्यापूर्वीच पोलीस रेल्वेस्थानकावर हजर होते. ही गाडी दुपारी २.१७ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. पथकातील सदस्यांनी एस ११ कोचमध्ये तपासणी केली. यावेळी बर्थ क्रमांक ५५, ५६ च्या खाली तीन बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. बॅगबाबत कोचमधील प्रवाशांना विचारणा केली असता कुणीच या बॅग आपल्या असल्याचे सांगितले नाही. त्यामुळे या बॅगची तपासणी केली असता एका बॅगमध्ये दारूच्या १००, दुसऱ्या बॅगमध्ये ६० आणि तिसऱ्या बॅगमध्ये ५२ अशा २१२ बॉटल आढळल्या. पकडण्यात आलेल्या दारूची किंमत १४ हजार रुपये आहे. लोहमार्ग पोलिसांनी दारूच्या बॉटल जप्त करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPoliceपोलिसliquor banदारूबंदी