शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अल्फा लाव्हल कंपनीच्या भागधारकांची बनावट खाती उघडून साडेतीन कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 12:58 IST

अल्फा लाव्हल कंपनीच्या भागधारकांची बनावट खाती उघडून कंपनीची ३ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देएकाला नवी मुंबईतून अटक : आर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी या भागधारकाचे कंपनीतील असलेल्या शेअर्सच्या बदल्यात त्यांना प्रति शेअर्स ४ हजार रुपये कंपनीच्या वतीने जुलै २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली तक्रार

पुणे : अल्फा लाव्हल कंपनीच्या भागधारकांची बनावट खाती उघडून कंपनीची ३ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने नवी मुंबईतून एका शेअर एजंटला अटक केली आहे़. सोनु निर्मला अगरवाल (वय ३८, रा़ पांडे निवास, आनंदनगर, नवी मुंबई) असे त्याचे नाव आहे़. त्याने लिंक ईनटाईम इंडिया या कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांना बनावट बँक खाती उघडण्यास मदत केली होती़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अल्फा लाव्हल या कंपनीतील भाग हे स्टॉक एक्सचेंजमधून डिलिट करण्यात आल्यानंतर त्यांचे काही भागधारकांचे भाग हे रद्द झाले होते़. या भागधारकाचे कंपनीतील असलेल्या शेअर्सच्या बदल्यात त्यांना प्रति शेअर्स ४ हजार रुपये देण्याचे ठरले़. या शेअर्सची रक्कम लिंक ईनटाईम इंडिया या कंपनीने त्यांचे उपलब्ध असलेल्या व त्यांनी दिलेल्या रेकॉर्डवरुन भागधारकांना देण्यात येत होते़. त्या दरम्यान काही भागधारक हे मृत्यु पावलेतर काहींचे पत्ते बदलले़त्यामुळे हे भागधारक परत कधीच कंपनीला मिळून येणार नाहीत़, अशी लिंक ईनटाईम इंडिया कंपनीतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना खात्री झाली़. या कंपनीच्या ढोले पाटील येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या साथीने संबंधित १८ भागधारकांची ओळखपत्रे, रहिवासी पुरावा, बँकेची कागदपत्रे, मागणीपत्र अशी कागदपत्रे खोटी तयार केली व या भागधारकांना शेअर्सचे पैसे दिले असे दाखवून त्यांनी अल्फा लाव्हल कंपनीची ३ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली़. हा सर्व प्रकार २०१५ मध्ये घडला होता़ दरम्यान, कंपनीला ही माहिती झाल्याने कंपनीच्या वतीने जुलै २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती़. अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त ज्योती प्रिया सिंग, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव, पोलीस शिपाई अमृता हरबा, संदीप गिºहे यांनी तपास केला़.  मुंबईतील शेअर बाजारात कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या सोनू अगरवाल याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या भागधारकांची बँकेत खाते काढण्यासाठी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले़. त्यावरुन सोनू अगरवाल याला गुरुवारी नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे़. त्याकडे लिंक ईनटाईम इंडिया कंपनीतील कोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याने मदत केली, याची चौकशी करण्यात येणार आहे़.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजी