शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

Cheating Case: हजारो लोकांना लुबाडलं; 100 कोटींच्या फसवणूक प्रकरणात BSFचा माजी स्वयंपाकी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 13:34 IST

Crime News: या सराईत गुन्हेगारावर 59 गुन्ह्यांची नोंद असून, 46 गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड होता.

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानमध्ये 100 कोटींहून अधिकच्या फसवणुकीत सहभागी असलेल्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, या सराईत गुन्हेगारावर 59 गुन्ह्यांची नोंद असून, 46 गुन्ह्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड होता. ओमराम उर्फ ​​राम मारवाडी असे पोलिसांनी पकडलेल्या या आरोपीचे नाव असून तो जोधपूरचा रहिवासी आहे. रोहिणी परिसरात आरोपी येणार असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

पैसे कमवण्यासाठी नोकरी सोडलीआरोपीचे शिक्षण फक्त बारावीपर्यंत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2004 ते 2006 दरम्यान त्याने बीएसएफमध्ये स्वयंपाकी म्हणून काम केले होते. पण लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी त्याने बीएसएफची नोकरी सोडली. यानंतर आरोपीने राजस्थानमधील जयपूरमध्ये सुरक्षा एजन्सी उघडली. जवळपास 60 जणांना नोकऱ्या मिळवून दिल्यानंतर त्याने एजन्सी दुसऱ्याला विकून स्वत:ची मार्केटिंग कन्सल्टन्सी कंपनी केली.

अशी केली 100 कोटींची फसवूकत्याने सतत फसवणूक करत एकामागून एक कंपन्या सुरू करुन, नंतर बंद केल्या. आरोपीने एमआयएम नावाने मार्केटिंग फर्म सुरू केली होती, ज्यामध्ये 4000 रुपये दिल्यावर 500चा सफारी सूट आणि नंतर जास्त कमिशन देण्याचा दावा केला जायचा. फसवणुकीच्या या धंद्यात सामील झालेल्या सदस्यांना 10 नवीन सदस्य करावे लागायचे. अशाप्रकारे 12 महिने हजारो सभासद बनवून सुमारे 100 कोटींची फसवणूक करून तो फरार झाला.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केलेआरोपीने 2021 मध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे नवीन काम सुरू केले. या प्लॅटफॉर्मवरही त्याने लोकांची फसवणूक करून लवकर अधिक पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत पोलिसांना 59 प्रकरणे निदर्शनास आली आहेत. तर, 46 प्रकरणात त्याला फरार घोषित करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीRajasthanराजस्थान