महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
By मुरलीधर भवार | Updated: May 9, 2024 20:55 IST2024-05-09T20:55:24+5:302024-05-09T20:55:37+5:30
कल्याण पूर्व परिसरात एका नामांकित महिला डॉक्टरचे क्लिनिक आहे. या क्लिनिक परिसरात एका टपरी आहे.

महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
कल्याण : महिला डॉक्टरवर पाळत ठेवून तिचा घरापर्यंत पाठलाग करुन सातत्याने मिस कॉल करणाऱ््या एकाला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मनसाराम धनवरे असे आहे. त्याचे तक्रारदार महिला डॉक्टरच्या क्लिनिक्स समोरच चप्पल विक्रीचे दुकान आहे.
कल्याण पूर्व परिसरात एका नामांकित महिला डॉक्टरचे क्लिनिक आहे. या क्लिनिक परिसरात एका टपरी आहे. मनसाराम धनवरे ही टपरी चालविताे. टपरीत बसून त्याची नजर डॉक्टरवर असायची. या डॉक्टरचा मनसाराम घरापर्यंत पाठलाग करायचा. महिला डॉक्टरचा पाठलाग आणि सातत्याने मिस कॉलरशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. इतकेच नाही तर डॉक्टटरला सातत्याने मिस कॉल देत त्रास देत होता.
अखेर या जाचाला कंटाळून महिला डॉक्टरने त्याच्या विरोधात कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करीत मनसाराम याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मनसारामला पोलिसानी अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायायलाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.