अडवून वाहनांची कागदपत्रे विचारणा-या तोतया पोलिसाला पाठलाग करुन पकडले
By दिपक दुपारगुडे | Updated: April 15, 2023 19:11 IST2023-04-15T19:10:39+5:302023-04-15T19:11:00+5:30
सोलापूर : करकंब-पंढरपूर मार्गावर थांबून पोलिस असल्याचा बहाणा करून वाहन चालकांना दमबाजी करत पैसे उकळणारा तोतया पोलीस समाधान गोरख ...

अडवून वाहनांची कागदपत्रे विचारणा-या तोतया पोलिसाला पाठलाग करुन पकडले
सोलापूर : करकंब-पंढरपूर मार्गावर थांबून पोलिस असल्याचा बहाणा करून वाहन चालकांना दमबाजी करत पैसे उकळणारा तोतया पोलीस समाधान गोरख मढे (रा. शिर्डी, जि. अहमदनगर) याच्यावर करकंब पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान मढे याने प्रकाश बनकर (रा. करकंब) यांची १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बार्डीपाटी येथे मोटारसायकल अडवली. याबरोबरच इतर मोटरसायकलींना अडवून लायसन्स व गाडीची कागदपत्रे मागितली. तसेच त्यांना दम देत.. पैसे काढा, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागेल म्हणत मोटारसायकल (एम.एच. १७ / सी.क्यू. ३१३८) वरील पुढील बोनेटवर महाराष्ट्र पोलीस लिहिलेले व महाराष्ट्र पोलिसांचा लोगो होता. मागील बाजूस इंग्रजी अक्षरात पोलीस लिहलेले वाहन निदर्शनास आले.
समाधान मढे हा बनकर यांना दम देत ए तुझ्या गाडीला नंबर नाही म्हणत त्याने जबरदस्तीने बनकर यांच्या शर्ट व पॅन्टचा खिसा जबरदस्तीने तपासून चोरीचा प्रयत्न केला. त्यानंतर फिर्यादी प्रकाश बनकर यांनी ट्रॅफिकचे हवालदार विजय गोरवे व शिपाई सुर्वे यांच्या त्याचा पठलाग करून गाडीसहित जळोली चौक येथे पकडली.
त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय फुगारे करीत आहेत.