शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

Lulu Mall Lucknow: लखनऊच्या लुलू मॉलबाहेर गोंधळ, हनुमान चालीसा पठणासाठी आलेल्या १५ जणांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 2:41 PM

Lulu Mall Lucknow:आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आंदोलक जय श्री रामच्या घोषणा देत होते.

उत्तर प्रदेशच्या राजधानीतील लुलू मॉलबाहेर हिंदू महासभेच्या लोकांनी पुन्हा एकदा निदर्शने केली आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आंदोलक जय श्री रामच्या घोषणा देत होते.स्वतःला हिंदू संघटना म्हणवून घेणाऱ्या आदित्य मिश्रा आणि त्यांच्या समर्थकांनी मॉलबाहेर निदर्शने केल्याचे सांगण्यात येत आहे. आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापटही झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सुमारे १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.आंदोलकांना मॉलमध्ये हनुमान चालीसा वाचायची होती

मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक हनुमान चालीसा वाचण्यासाठी मॉलमध्ये आले होते. यावेळी त्यांनी विरोधही सुरू केला. माहिती मिळताच आलेल्या पोलिसांना पाहताच काही आंदोलक पळू लागले. काही वेळ पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची सुरु होती. यानंतर पोलिसांनी मॉलभोवती धावणाऱ्या आंदोलकांना पकडले. याआधीही हिंदू महासभेच्या लोकांनी लुलू मॉलबाहेर निदर्शने केली होती. महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजता मॉलमध्ये सुंदरकांड पठण करण्याची घोषणा केली होती. पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले असले, तरी परवानगीशिवाय मॉलमध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी आलेल्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली.वाद कसा सुरू झाला?रविवारी, १० जुलै रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लुलू मॉलचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर, मंगळवारी, १२ जुलै रोजी एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये काही लोक लुलू मॉलच्या कॅम्पसमध्ये नमाज अदा करताना दिसत होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखिल भारत हिंदू महासभेने तीव्र आक्षेप घेतला होता. हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी म्हणाले होते, 'लोकांनी लुलू मॉलमध्ये जमिनीवर बसून नमाज अदा केली, या व्हिडिओने हे सिद्ध केले की लुलू मॉलमध्ये सरकारी आदेशांचे उल्लंघन होत आहे. लुलु मॉल हा देशातील सर्वात मोठा मॉल आहेलुलू मॉल हा देशातील सर्वात मोठा मॉल आहे, जो सुशांत गोल्फ सिटीमध्ये बांधला गेला आहे. हा मॉल 2.2 दशलक्ष स्क्वेअर फूटमध्ये बांधला आहे. येथील सर्वात खास म्हणजे लुलु हायपर मार्केट. यासोबतच अनेक ब्रँडचे शोरूमही उघडण्यात आले आहेत. मॉलमध्ये 15 रेस्टॉरंट आणि कॅफे आहेत. 25 ब्रँड आउटलेटसह एक फूड कोर्ट देखील आहे, ज्यामध्ये 1600 लोक एकत्र बसू शकतात.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशNamajनमाजPoliceपोलिसHinduहिंदू