शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Chandigarh Hit And Run Case: हिट अँड रन...कुत्र्याला बिस्कीट देत होती 25 वर्षीय तरुणी, भरधाव थारने उडवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 13:32 IST

Chandigarh Hit And Run Case: याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस आरोपीच्या शोधात आहेत.

Hit and Run case: चंदीगडमध्ये शनिवारी रात्री एका भीषण हिट अँड रन प्रकरणात 25 वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही तरुणी रात्री रस्त्यावर उभी राहून कुत्र्यांना बिस्कीट खाऊ घालत होती, यावेळी एका भरधाव थार गाडीने तिला चिरडलं आणि पळून गेली. चंदीगडमधील फर्नीचरवाला मार्केटमध्ये हा अपघात घडला. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.

रुग्णालयात उपचार सुरूमिळालेल्या माहितीनुसार, तेजस्विता कौशल(25) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे. शनिवार रात्री 11:39 वाजता तेजस्विता फर्नीचरवाला मार्केटमध्ये रस्त्यावरील कुत्र्यांना बिस्कीट देत होती. यावेळी एका भरधाव थार गाडीने तिला उडवलं. यानंतर चालक गाडी घेऊन फरार झाला. सध्या जीएमएसएच-16 रुग्णालयात तेजस्वितावर उपचार सुरू आहेत. या घटनेत तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, दोन्ही बाजूने टाके मारावे लागले आहेत. 

रोज कुत्र्यांना अन्न देतेयाप्रकरणी सेक्टर-61 पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघाताची सीसीटीव्ही फुटेज तरुणीचे वडील ओजस्वी कौशलने मिळवली. धडक दिल्यानंतर थार ड्रायव्हर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तेजस्विताच्या वडिलांनी सांगितले की, तेजस्विता आर्किटेक्टमध्ये ग्रॅज्युएट असून, सध्या यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. ती दररोज रात्री आपल्या आईसोबत रस्त्यावरील कुत्र्यांना अन्न देते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघात