शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

चड्डी-बनियन टोळीच्या सराईताला अटक; २४.७४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 14:30 IST

त्याच्याकडून चोरीला गेलेला २४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.

मुंबई : गेल्या सात वर्षांपासून चड्डी-बनियन घालत घरफोड्या करून परराज्यात पळून जाणारा अट्टल सराईत आरोपी चिंटू चौधरी निषाद (३४) याच्या घाटकोपर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीला गेलेला २४ लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.विद्याविहार परिसरात राहणारे तक्रारदार अभय  गोकानी हे ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत लोणावळा येथे फिरायला गेले असताना अज्ञाताने त्यांच्या बेडरूमच्या खिडकीची संरक्षक ग्रील तोडून आत प्रवेश केला. तसेच तिथल्या लाकडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील ड्रॉव्हरमधून २४ लाखांचे दागिने आणि रोख ७४ हजार रुपये पळवून नेले. गोकानी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम ४५४, ४५७ व ३८० गुन्हा दाखल केला.परिमंडळ ७ चे पोलिस उपायुक्त पुरुषोत्तम कराड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद कोकाटे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे आणि पथकाने  दिवा रेल्वे स्थानक ते साबे गावातील सरकारी तसेच खासगी अशा १९० सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि पुढील कारवाई केली. 

विरार, टिळकनगरमधील गुन्ह्यांची उकल होणारपथक उत्तर प्रदेश राज्यात आरोपीच्या गावी गेले. तिथे तांत्रिक व अल्प कालावधीत गुप्त बातमीदार तयार करून स्थानिक पोलिस ठाणे बन्सी कोतवालीच्या मदतीने तहसील कार्यालयासमोर गर्दीत सापळा रचून शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. या अटकेमुळे विरार, खांदेश्वर, कासारवडवली, टिळकनगर एम. एच. बी. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील जवळपास २० ते २५ गुन्ह्यांची उकल होण्याचा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिस