Narada Scam: सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 11:32 AM2021-05-17T11:32:21+5:302021-05-17T11:33:08+5:30

One minister to face arrest of West bengal by CBI: काही दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारदा स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. नारदा स्टिंगचा व्हिडीओ समोर आल्यावेळपासून हे नेते ममतांच्या सरकारमध्ये मंत्री होते. राज्यपालांनी निवडणूक संपताच तातडीने या नेत्यांवरील कारवाईला मंजुरी दिली होती. 

CBI detains four leaders, including two ministers of Trinamool in Narada scam; Mamata banerjee also reached | Narada Scam: सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या

Narada Scam: सीबीआयने तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना ताब्यात घेतले; मागोमाग ममतादेखील पोहोचल्या

Next

विधानसभा निवडणुक संपून पश्चिम बंगालमध्येममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे पुन्हा सरकार स्थापन होताच पुन्हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरु झाला आहे. ममतांचे सरकार स्थापन होताच, त्यांच्या मंत्र्यांविरोधात नारदा घोटाळ्याची (Narada sting case) पुन्हा चौकशी सुरु झाली आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर सीबीआयने (CBI) छापेमारी केली आहे. या नंतर चारही नेत्यांना सीबीआयने कार्यालयात नेले आहे. हे समजताच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या आहेत. (The Central Bureau of Investigation (CBI) arrested ministers Firhad Hakim and Subrata Mukherjee, TMC MLA Madan Mitra, and former Kolkata Mayor Sovan Chattopadhyay in the Narada bribery case on Monday.)


तृणमूल काँग्रेसच्या चारही नेत्यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याचे समजताच बंगालच्या राजकारणात भूकंप आला आहे. नेत्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरु झाले आहे. यातच ममता या सीबीआय कार्यालयात गेल्या आहेत. या साऱ्या घडामोडींमध्ये सीबीआयचे अधिकारी ममतांच्या मंत्र्यांची चौकशी करत आहेत. 
सीबीआयच्या टीमने सोमवारी सकाळी परिवाहन मंत्री आणि कोलकाता नगर पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरावर छापा टाकला. थोडा वेळ शोध घेऊन हकीम यांना सीबीआयने उचलले. तेव्हा हकीम यांनी आपल्याला नारदा घोटाळ्यात अटक केले जात असल्य़ाचे सांगितले. यामुळे त्यांच्या समर्थकांनी हकीम यांच्या घरासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. 




दुसरीकडे सीबीआयच्या टीमने सुब्रत मुखर्जी आणि मदन मित्रा यांना देखील त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. याचबरोबर भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरीदेखील सीबीआयने छापा मारला. सोवन चटर्जी यांनी विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलमधून भाजपात प्रवेश केला होता. मात्र, तिकिट न मिळाल्याने त्यांनी भाजपा सोडली होती. 

सीबीआयने अटकेच्या वृत्ताचा केला इन्कार
या चारही नेत्यांना नारदा घोटाळ्यात चौकशीसाठी सीबीआय़ कार्यालयात आणण्यात आले आहे, या चारही नेत्यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र, त्यांना अटक केली नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. 
काही दिवसांपूर्वीच राज्यपाल जगदीप धनखड यांनी नारदा स्टिंग प्रकरणी फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी परवानगी दिली आहे. नारदा स्टिंगचा व्हिडीओ समोर आल्यावेळपासून हे नेते ममतांच्या सरकारमध्ये मंत्री होते. राज्यपालांनी निवडणूक संपताच तातडीने या नेत्यांवरील कारवाईला मंजुरी दिली होती. 

Web Title: CBI detains four leaders, including two ministers of Trinamool in Narada scam; Mamata banerjee also reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.