शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

हनीट्रॅपमध्ये अडकला अन् महिला आयएसआय एजंटला माहिती लीक करणाऱ्या जवानाला पडल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 19:55 IST

Army Man Arrested :राजस्थान पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराशी संबंधित माहिती लीक करणाऱ्या २४ वर्षीय लष्करी जवानाला एका पाकिस्तानी महिलेने आपल्या हनीट्रॅप अडकवले होते.

भारतीय लष्करातील जवान प्रदीप कुमार याला शनिवारी, २१ मे रोजी पाकिस्तानला लष्करी माहिती लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. राजस्थानपोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराशी संबंधित माहिती लीक करणाऱ्या २४ वर्षीय लष्करी जवानाला एका पाकिस्तानी महिलेने आपल्या हनीट्रॅप अडकवले होते.जोधपूरमध्ये तैनात असलेला प्रदीप कुमार फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात आला. प्रदीपच्या संपर्कात राहण्यासाठी तिने हिंदू महिला असल्याचे भासवल्याचा आरोप आहे. या महिलेने स्वत:ची ओळख छदम असून ती मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी असल्याची बतावणी केली.पाकिस्तानी एजंटने कुमारला विश्वासात घेतले आणि ती बेंगळुरूमधील एका कॉर्पोरेट फर्मसाठी काम करते असे सांगितले. अनेक महिन्यांनंतर कुमार लग्नाच्या बहाण्याने दिल्लीत आला आणि भारतीय लष्कराशी संबंधित गोपनीय कागदपत्रे मागितली. लष्करीसंबंधित गोपनीय माहितीचे फोटो पाकिस्तानी महिलेला पाठवण्यात आले होते, जी महिला कथितरित्या आयएसआयसाठी काम करते.पोलिसांनी सांगितले की, कुमार आणि पाकिस्तानी महिला सहा महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. इंटेलिजन्सचे डीजी उमेश मिश्रा यांच्या मते, कुमारने व्हॉट्सअॅपद्वारे पाक एजंटसोबत धोरणात्मक योजनेबाबतच्या कागदपत्रांच्या फोटोंची देवाणघेवाण केली आणि इतर सैनिकांना बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न केला गेला. कुमारच्या आणखी एका महिला मैत्रिणीचाही या गुन्ह्यात सहभाग होता.हेरगिरीच्या संशयावरून राजस्थान पोलिसांनी १८ मे रोजी कुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि शनिवारी, २१ मे रोजी अटक करण्यात आली होती.

टॅग्स :honeytrapहनीट्रॅपRajasthanराजस्थानPoliceपोलिसSoldierसैनिकArrestअटकPakistanपाकिस्तान