शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात साडेचार लाख रुपयांची रोकड पकडली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 20:39 IST

शहरात खळबळ; रोख रक्कम निवडणूक विभागाकडे जमा

ठळक मुद्देबुलडाणा येथून जळगाव जामोदकडे जात असलेल्या एम एच २८-व्ही-१०५४ या इंडिका कारची निवडणूक विभागाच्या स्थिर संरक्षण पथकाने तपासणी केली असता या कारमध्ये साडेचार लाख रुपयांची रक्कम आढळून आली. रक्कमेच्या तपासणीनंतर सदर रक्कम निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

खामगाव -  एका कारमधून जळगाव जामोदकडे नेल्या जाणारी साडेचार लाख रुपयांची रोख रक्कम निवडणूक विभागाच्या स्थिर संरक्षण पथकाने पकडली. शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका मळ्याजवळ सायंकाळी ५:३० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. रक्कमेच्या तपासणीनंतर सदर रक्कम निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

बुलडाणा येथून जळगाव जामोदकडे जात असलेल्या एम एच २८-व्ही-१०५४ या इंडिका कारची निवडणूक विभागाच्या स्थिर संरक्षण पथकाने तपासणी केली असता या कारमध्ये साडेचार लाख रुपयांची रक्कम आढळून आली. त्यामुळे स्थीर संरक्षण पथकाने कार चालक राजू भिकाजी जायभाये रा. किनगाव जट्टू आणि सुरेश परसराम जाधव रा. किनगाव जट्टू  यांना ताब्यात घेतले. शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये रक्कमेची तपासणी केल्यानंतर सदर रक्कम निवडणूक विभागाच्या स्वाधीन करण्यात आली. निवडणूक विभागाच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल. स्थिर संरक्षण पथक प्रमुख निखिल कवाडे, वाहतूक पोलिस रफीक शहा, राहुल इंगळे, सागर मोरे,  गजानन चोपडे, पीएसआय सुरवाडे, बाळू फुंडकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे. तथापि, ही रक्कम कामगारांचे वेतन अदा करण्यासाठी तथा किरकोळ बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी घेवून जात असल्याचे शासकीय कंत्राटदार सुरेश परसराम जाधव रा. किनगाव जट्टू  यांनी चौकशी दरम्यान सांगितले.

 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी