शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यावर गुन्हा दाखल; महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 13:09 IST

बदनामीचा प्रकार असल्याचा सातपुते यांचा दावा

ठळक मुद्देखेरवाडी पोलीस ठाण्यात केल्यानंतर याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा सातपुते यांचा दावा आहे.अभिनेत्री तनुश्री दत्ताचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यावर करण्यात आला आहे.

गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - सोसायटीतील वादातून महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताचे वकील अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा सातपुते यांचा दावा आहे.विजया ( नावात बदल ) ही महिला माहीमच्या ओम सिद्धिविनायक को. ऑप सोसायटीमध्ये राहते. याच सोसायटीत अ‍ॅड. सातपुते राहतात. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर, २०१९ मध्ये या सोसायटीची मिटिंग घेण्यात आली होती. सातपुते हे तळमजल्यावर राहत असुन त्यांच्या घरासमोर गार्डन आहे. या गार्डनचे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान बनवण्यात यावे, अशी विनंती विजयाने मिटिंगदरम्यान केली. याचा राग ऍड सातपुते यांच्या मनात होता, त्यातूनच २ नोव्हेंबर, २०१९ रोजी फोन करुन शिवीगाळ केली.

याप्रकरणी महिलेने माहीम पोलिसात तर ४ नोव्हेंबर २०१९ रोजी तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. २७ नोव्हेंबर, २०१९ रोजी याबाबत बार असोसिएशन- वांद्रे, पोलीस आयुक्त मुंबई, बार कौन्सिल ऑफ मुंबई व गोवा हायकोर्ट, माहिम पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. महिला आयोग वांद्रे याठिकाणी १६ डिसेंबर, २०१९ साली संयुक्त मीटिंग आयोजित करण्यात आली होती. मात्र त्या मिटिंगला अ‍ॅड. सातपुते गैरहजर होते. त्यानंतर ३० डिसेंबर, २०१९ ला पुन्हा महिला आयोगाच्या म्हाडा कार्यालयात विजया हजर होत्या. त्यावेळी सातपुते यांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. याची तक्रार त्यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात केल्यानंतर याप्रकरणी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

हा तर बदनामीचा प्रकार - अ‍ॅड. नितीन सातपुतेमी संबंधित महिलेच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करविला आहे. त्यांनंतर तिने माझ्या विरोधात खोटा आरोप करत गुन्हा दाखल करविला. जे काही घडले ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हा सर्व निव्वळ बदनामीचा प्रकार असून सत्य लवकरच उघड होईल.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीadvocateवकिलPoliceपोलिसMumbaiमुंबई