किशोरवयीन मुलीची ओढणी खेचून अश्लील वर्तन करणाऱ्या 'रोमिओ'विरुद्ध गुन्हा
By विलास जळकोटकर | Updated: March 14, 2024 19:30 IST2024-03-14T19:29:35+5:302024-03-14T19:30:59+5:30
अनिल काशिनाथ थोरात असे गुन्हा नोंदलेल्याचे नाव आहे, रात्री आठच्या सुमारासची घटना

किशोरवयीन मुलीची ओढणी खेचून अश्लील वर्तन करणाऱ्या 'रोमिओ'विरुद्ध गुन्हा
विलास जळकोटकर, सोलापूर: १७ वर्षाच्या किशोरवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिची ओढणी खेचून अश्लील वर्तन करणाऱ्या रोडरोमिओविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री आठच्या सुमारास शहरातील एका नगरामध्ये घडला.
अनिल काशिनाथ थोरात असे गुन्हा नोंदलेल्याचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पडिता शहरातील एका नगरामध्ये राहते. ती शालेय शिक्षण घेत असून, गेल्या दिवसांपासून नमूद आरोपी तिचा पाठलगा करीत होता. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पिडित किशोर वयीन मुलगी गल्लीतील दवाखाना सुरु आहे का? हे पाहण्यासाठी पायी चालत निघाली होती.
वाटेत नमूद आरोपीने तिला अडवले. हात धरुन तिची ओढणी खेचून लज्जास्पद वर्तन केले. या प्रकाराबद्दल तिने घरी नातलगांना या प्रकाराबद्दल सांगितले. नातलगासमवेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिल्याने या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंदला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू करीत आहेत.