शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान व दत्त मंदिराच्या पुजारी कुटुंबियांची फसवणूक केल्याप्रकरणी भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 10:00 IST

पोलीस आयुक्त सदानंद दाते व उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोड पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या नवघर गावातील हनुमान मंदिर व दत्त मंदिरचे पुजारी कुटुंबियांची जमीन प्रकरणात फसवणूक करून ती बळकावल्या प्रकरणी भाजपाचे वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहतांसह माजी महापौरांचे पती विनोद मेहता तिवारी इंजियरिंग कॉलेजचे राहुल व लल्लन तिवारी आदींवर बुधवारी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाईंदरच्या नवघर गावातील दत्त मंदिरचे सच्चिदानंद पावसकर हे पुजारी होते. त्यांची व कुटुंबियांची सामायिक मालकीची जमीन ही मीरारोडच्या कनकिया भागात मौजे नवघर सर्वे क्र. ५२/१ ही सुमारे १ हेक्टर ११ गुंठे इतकी आहे. २००५ साली त्यावेळी नगरसेवक असताना नरेंद्र मेहता यांनी सदर जमीन खरेदी साठी श्यामभाई ह्या दलाला मार्फ़त पावसकर कुटुंबियांचे घर गाठले. १ कोटी रुपयांचा मोबदला सांगितला असता मेहतानी धमकावून केवळ ६० लाख देणार सांगत अनोंदणीकृत विक्री करार व कुलमुखत्यार आदी कागदांवर सह्या घेतल्या. परंतु मेहतानी पावसकर कुटुंबियांना केवळ १५ लाख रुपयेच दिले. त्यामुळे पावसकर कुटुंबीयांनी अनोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र आदी रद्द केल्याची नोटीस देत वृत्तपत्रात तशी प्रसिद्धी केली. 

दुसरीकडे मेहतानी अनोंदणीकृत कुलमुखत्यार पत्रचा गैरवापर करत पावसकर यांच्या जमिनीचा एक भाग हा लल्लन तिवारी व राहुल तिवारी यांना दीड कोटींना विकली. तर जमीनचा एक भाग मेहतानी सेव्हन इलेव्हन हॉटेल्सला भाऊ विनोद मेहता द्वारे हस्तांतरित केला.  तर काही जमिनीचा पालिकेकडून टीडीआर घेतला. फिर्यादी ज्योत्स्ना पावसकर यांच्या आई वेणूबाई यांचे निधन झाले असताना देखील जमिनीची परस्पर विक्री, बनावट अंगठा लावून फेरफार आदी प्रकार केले. मेहतानी यूएलसी च्या जमीन क्षेत्राची विक्री तिवारी ना केली. मेहता व तिवारी यांनी संगनमताने हे केले. एका भागात तिवारी यांनी तिवारी इंजिनिअरिंग कॉलेज बांधले आहे. 

फिर्यादी वरून मीरारोड पोलिसांनी नरेंद्र मेहतांसह विनोद मेहता, राहुल तिवारी, लल्लन तिवारी, तत्कालीन तलाठी विजय पवार, कमलेश अंबानी, सेव्हन इलेव्हन कन्स्ट्रक्शन व सेव्हन इलेव्हन हॉटेल्स, राहुल एज्युकेशन व राहुल ग्रुप निर्माण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त सदानंद दाते व उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरारोड पोलीस या गुन्ह्याचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMira Bhayanderमीरा-भाईंदर