महिलेस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

By सचिन राऊत | Updated: December 24, 2023 21:13 IST2023-12-24T21:12:49+5:302023-12-24T21:13:05+5:30

सासूकडूनही नेहमी शिवीगाळ, मानसिक त्रास देणे, जेठ, जेठाणी, नणंदेकडून पतीस भडकावणे सुरू झाले.

Case against five persons for threatening to kill woman | महिलेस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

महिलेस जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा

अकोला : तेल्हारा तालुक्यात रहिवासी असलेल्या एका महिलेस जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसानी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
जस्तगाव येथील २६ वर्षीय विवाहितेचा पती मद्यप्राशन करून घरी येऊन तिला रोज मारहाण करीत असे या सोबतच सासरच्या मंडळीनेही विवाहितेला शिवीगाळ करून शारीरिक, मानसिक त्रास सुरू केला. 

सासूकडूनही नेहमी शिवीगाळ, मानसिक त्रास देणे, जेठ, जेठाणी, नणंदेकडून पतीस भडकावणे सुरू झाले. ‘माहेरून १ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर येथे राहू नको’, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी, तिच्या वडिलांनाही शिवीगाळ करणे आदी आरोप तक्रारीत केले. तक्रारप्रकरणी महिला तक्रार निवारण कक्ष अकोट येथे समेट घडून आला नाही. 

भरोसा सेल अकोला येथेही समेट घडून न आल्याने अखेर तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये पती सतीश रमेश जवंजाळ (३०), सासू गोदावरीबाई रमेश जवंजाळ (५५), जेठ प्रवीण रमेश जवंजाळ (३५), जेठाणी स्नेहा प्रवीण जवंजाळ, रमेश जवंजाळ, सर्व रा. जस्तगाव ता. तेल्हारा यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पो. नि. सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

Web Title: Case against five persons for threatening to kill woman