शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! ऑनलाईन पिझ्झा पडला 95 हजारला अन् बिर्याणी 50 हजारांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 16:50 IST

ऑनलाईन काहीही वस्तू मागवत असाल तर सायबर चोरट्यांपासून सावध रहा. 

ठळक मुद्दे झोमॅटोसारख्या अ‍ॅपवरून यांनी हे अन्न मागवले होते. मात्र, काही कारणाने त्या तिघांची तक्रार असल्याने त्यांनी झोमॅटो कस्टमर केअरला कॉल केला आणि गमावून बसले हजारो रुपये. झोमॅटो कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बनून 'गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली' आणि पैसे परत करण्याच्या नावावर बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातील पैसे साफ केले. 

नवी दिल्ली - पटनाचा अभियंता असलेल्या तरुणीने १०० रुपयांच्या परताव्यासाठी चक्क ७७ हजार गमावले आहेत. बेंगळुरूमधील एकाने पिझ्झा  मागवून ९५ हजार गमावले तर  हैदराबाद येथील टेक प्रोफेशनलने खास चिकन बिर्याणीसाठी ५० हजार रुपयांनी खिसा खाली केला आहे. या तिन्ही वेगवेगळ्या प्रकरणात शुल्लक रक्कमेसाठी सायबर चोरट्यांनी हजारोंचा गंडा घातला आहे. झोमॅटोसारख्या अ‍ॅपवरून यांनी हे अन्न मागवले होते. मात्र, काही कारणाने त्या तिघांची तक्रार असल्याने त्यांनी झोमॅटो कस्टमर केअरला कॉल केला आणि गमावून बसले हजारो रुपये. त्यामुळे तुम्ही जर ऑनलाईन काहीही वस्तू मागवत असाल तर सायबर चोरट्यांपासून सावध रहा. 

सायबर चोरट्यांचा एक बनावट ग्राहक सेवा क्रमांक (कस्टमर केअर नंबर) आहे. सप्टेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान या सायबर चोरट्यांच्या तावडीत सापडलेल्या तिघांसोबत घडलेली घटना सारखीच आहे. या तिघांनी झोमॅटोवरून ऑनलाइन जेवणाची ऑर्डर दिली. एकाचे जेवण त्या पत्त्यावर पोहोचले नाही, दुसऱ्याचे जेवण घरपोच मिळाले तेव्हा लक्षात आले की त्यात आणखी काही वस्तू आल्या नाहीत तर तिसऱ्याला जेवण मिळाले पण त्याला ते आवडले नाही. म्हणून तिघेही नाराज झाले होते. रागाच्या भरात त्यांनी इंटरनेटवरून झोमॅटोचा कस्टमर केअर क्रमांक शोधला आणि फोन केला. हीच घोड चूक त्या तिघांनी केली आणि बनावट कस्टमर केअर क्रमांकाशी आपलया बँक खात्याची सर्व माहिती देऊन हजारो रुपये गमावून बसले. झोमॅटोचा कस्टमर केअर क्रमांक नसून ते फक्त चॅट किंवा ईमेल वर उपलब्ध आहे, असे झोमॅटो कंपनीकडून स्पष्ट सांगण्यात आले.  म्हणजेच फोनवर या तिघांचे बोलणे झाले ते सर्वच फसवे फोन होते. त्यांनी झोमॅटो कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह बनून 'गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली' आणि पैसे परत करण्याच्या नावावर बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातील पैसे साफ केले. 

इंटरनेटवर आहे बनवत कस्टमर केअर क्रमांकाचा भडीमार 

डेबिट कार्ड हरवले, एटीएममधून पैसे काढले नाहीत तशीही पैसे खात्यातून वजा झाले, आयआरसीटीसीवर तिकिटे बुक करताना तिकिटे बुक झाले नाही मात्र पैसे गेले, मोबाइल बँकिंगमधून पैसे पाठवायचे आहेत परंतु त्रुटी येत आहे, अशा सर्व अडचणीच्या वेळी आपण ताबडतोब कस्टमर केअर क्रमांक शोधतो. आणि आपल्यातील काही बनावट हेल्पलाइन नंबरमध्ये सापडतात आणि खिसा कापतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी अशा फसवणूकीपासून सावध राहावे. म्हणजेच स्वतःच्या कष्टाने कमावलेल्या पैशांवर सायबर डल्ला मारण्यास आळा बसेल.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमZomatoझोमॅटोMONEYपैसाfoodअन्न