Sangli Accident: म्हैसाळ येथे कार ट्रॅक्टरची भीषण धडक; एक जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 21:19 IST2022-02-11T21:19:26+5:302022-02-11T21:19:38+5:30
म्हैसाळ :- मिरज -म्हैसाळ रस्त्यावर म्हैसाळ येथील पूजा फर्निचर समोर MH 12 AP 1157 इंडिका कार व MH44 D ...

Sangli Accident: म्हैसाळ येथे कार ट्रॅक्टरची भीषण धडक; एक जण जागीच ठार
म्हैसाळ :- मिरज -म्हैसाळ रस्त्यावर म्हैसाळ येथील पूजा फर्निचर समोर MH 12 AP 1157 इंडिका कार व MH44 D 2783 या ट्रक्करची धडक होऊन ट्रक्टर चालक जागीच ठार झाला.तर इंडिका कार मधील नेमिनाथ चौंडाज (वय32) व चालक प्रविण सांळुखे (वय26) हे दोघे राहणार म्हैसाळ ता.मिरज जि.सांगली हे किरकोळ जखमी झाले आहेत.सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला. जखमींना सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबत घटनास्थनावरून मिळाली माहिती अशी की -ऊसाचा मोकळा ट्रक्कर म्हैसाळ कडून मिरजेच्या दिशेने चालला होता. तर इंडिका कार मिरजेहून म्हैसाळ कडे येत होती. यावेळी ट्रक्कर व इंडिका कारची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की इंडिका कार रस्ताच्या बाजूला असणाऱ्या शेतात गेली. तर ट्रक्कर रस्ताकडेला असणाऱ्या पाण्याने भरलेल्या खड्डात गेली. यावेळी ट्रक्कर चालकांने जीव वाचवण्यासाठी ट्रक्करमधून उडी मारली पण चालकाचे डोके चाकाखाली अडकल्याने डोक्यावरून चाक जाऊन ट्रक्कर चालक जागीच ठार झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद आहे.अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी.एस. विटेकरी करत आहेत.