शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

धक्कादायक! बॉयफ्रेंडच्या सांगण्यावरून मुलींच्या हॉस्टेलच्या बाथरुममध्ये लावला कॅमेरा; चंदीगडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 20:27 IST

चंदीगडमधून पुन्हा एकदा एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. मुलींच्या वसतिगृहात छुप्या कॅमेऱ्याने अश्लील व्हिडिओ बनवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पंजाबमधील चंदीगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या अगोदरही असेच एक प्रकरण समोर आले होते, चंदीगड विद्यापीठातील एका मुलीने विद्यार्थिनींच्या बाथरुममध्ये छुपा कॅमेरा लावल्याचे समोर आले. वसतिगृहातील बाथरुममध्ये कॅमेरा लावून अश्लिल व्हिडीओ शुटींग केल्याचे समोर आले आहे. हॉस्टेलमध्ये राहणारी एक तरुणी तिच्या प्रियकराला कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलेले अश्लील व्हिडिओ पाठवत होती. पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक, शेकडो नागरिकांना घातला गंडा!

मिळालेली माहिती अशी, चंदीगडमधील सेक्टर २२ मध्ये असलेल्या पीजीच्या बाथरूममध्ये कॅमेरा लावून सोबत असलेल्या मुलींचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून प्रियकराला पाठवता यावेत यासाठी मुलीने बाथरूममध्ये गिझरच्या वर कॅमेरा बसवला होता. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. मुलीने प्रियकराच्या सांगण्यावरून बाथरूममध्ये कॅमेरा बसवल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. वसतिगृहातील तरुणी अंघोळ करत असताना गिझरवर कॅमेरा दिसल्याने ही बाब उघडकीस आली. मुलीने वसतिगृह चालकाला माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून ऑपरेटरने पोलिसांना कळवले आणि संपूर्ण प्रकरण उघड झाले.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोघांचे मोबाईल सील करून सीएफएसएल लॅबमध्ये पाठवले. लॅबच्या अहवालावरून स्पष्ट होईल की आरोपींनी सहकारी मुलींचे किती व्हिडिओ बनवले आहेत आणि ते पुढे कोणाकडे पाठवले आहेत? त्याचा तपास पोलीस करत आहेत. 

दोन्ही आरोपींची चौकशी करण्यासोबतच त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही कोठडी सुनावण्यात येणार आहे. दुसरीकडे, हा खुलासा झाल्यानंतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 354 सी, 509 आणि 66 आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस