तक्रार देण्यासाठी आले अन् पोलीस स्टेशनमध्येच भिडले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Updated: September 10, 2023 13:51 IST2023-09-10T13:51:16+5:302023-09-10T13:51:25+5:30
पोलिसांसमोरच मारहाण सुरू झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी त्यांच्यातील हाणामारी थांबवली.

तक्रार देण्यासाठी आले अन् पोलीस स्टेशनमध्येच भिडले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
डोणगाव : मारहाणीची एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशमध्ये आलेल्या तिघे पोलिसांसमोरच भिडले. एकमेकांना चापटाबुक्यांनी मारहाण करू लागले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करावी लागली. ही घटना डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये ९ सप्टेंबर रात्री १२. १० वाजता घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध रात्री ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
साजन शहा अब्दुल शहा , परवेश समद शेख व तबरेज समद शेख हे एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये ९ सप्टेंबर रोजी रात्री आले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करून पोलीस स्टेशनला आणण्यात आले होते. तेथे त्यांच्यात पोलीस स्टेशनमध्येच वाद झाला. त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करणे सुरू केले. तसेच चापटाबुक्यांनी मारहाण करणे सुरू केले.
पोलिसांसमोरच मारहाण सुरू झाली. अखेर पोलिसांनी मध्यस्थी त्यांच्यातील हाणामारी थांबवली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी आनंद चोपडे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या हाणामारीची डोणगाव परिसरात चर्चा सुरू आहे.