शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:23 IST

पैशांच्या लोभापायी नात्यांमधील विश्वास आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पैशांच्या लोभापायी नात्यांमधील विश्वास आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना राजस्थानमधील बाडमेर येथे समोर आली आहे. या घटनेबद्दल ऐकणाऱ्या प्रत्येकालाच धक्का बसत आहे. एका तरुणीच्या वडिलांनी आणि चुलत भावाने तिच्या मोबाईल नंबरवरून मेसेज पाठवून एका ओळखीच्या तरुणाला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याला तीन दिवस ओलीस ठेवून मारहाण करत पैशांची मागणी केली.

सदारची घटना बाडमेरच्या शिवनगर परिसरातील आहे. पोलिसांनी कट रचणाऱ्या काका-पुतण्याला अटक केली असून, एक आरोपी अजूनही फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनच्या रात्री एक २४ वर्षीय तरुण आपल्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. त्याचवेळी त्याला व्हॉट्सॲपवर एका ओळखीच्या तरुणीचा मेसेज आला.

रूमवर पोहोचल्यावर तरुणाला धक्काच बसला!मेसेजमध्ये तरुणीने या तरुणाला भेटायला बोलावले होते. या तरुणाला शिवनगरमधील एका हॉटेल रूमवर बोलावण्यात आले होते. तरुण त्या तरुणीला आधीपासून ओळखत असल्याने त्याला कोणताही संशय आला नाही. तो तरुणीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचला. मात्र, जसा तो रूममध्ये शिरला, तसा त्याला धक्काच बसला. तिथे ती तरुणी नव्हे, तर तिचे वडील, तिचा चुलत भाऊ आणि आणखी एक तरुण त्याची वाट पाहत होते.

आरोपींनी तरुणाला ओलीस ठेवून केली मारहाणतिघांनी मिळून त्या तरुणाला पकडले आणि त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्याला ओलीस ठेवून मारहाण देखील केली. त्यानंतर खोट्या बलात्कार प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर, आरोपींनी तरुणाचे कपडे काढून त्याचे नग्न फोटो आणि व्हिडीओ बनवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत, २० लाख रुपयांची खंडणी मागितली.

कुटुंबीयांनी पोलिसांना दिली माहिती तरुणाने आपल्याकडे इतके पैसे नसल्याचे सांगत आरोपींकडे विनवणी केली. त्यानंतर आरोपींनी रक्कम कमी करून, पाच लाख रुपयांची मागणी केली. या तरुणाने कसाबसा आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली, परंतु आरोपी पाच लाखांवर ठाम राहिले. अखेर पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी केली तरुणाची सुटका!पोलिसांनी तरुणाचे लोकेशन ट्रेस करत त्याला शिवनगरमधून सोडवले, परंतु तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. त्यानंतर बाडमेर पोलिसांनी या काका-पुतण्याला त्यांच्या गावातून अटक केली. चौकशीदरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. सध्या पोलीस तिसऱ्या आरोपीच्या शोधात आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानfraudधोकेबाजी