Delhi Crime: दिल्लीत ब्रिटीश महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. दिल्लीतील महिपालपूर येथील एका हॉटेलमध्ये एका ब्रिटिश महिलेवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात वसंत कुंज उत्तर पोलीस ठाण्याने दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाबाबत दोघांचीही चौकशी सुरू आहे.
सोन्याचे हार ते महागड्या कार... आशीला दिल्या लाखोंच्या भेटवस्तू; TI प्रकरणात नवा ट्विस्ट
मिळालेली माहिती अशी, सोशल मीडियाद्वारे या महिलेसोबत एका मैत्री केली. त्या मित्रांनाच भेटण्यासाठी ती महिला दिल्लीला आली होती. या हॉटेलमध्ये त्या मित्राने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती ब्रिटीशच्या उच्च अधिकाऱ्यांना दिली आहे.
दिल्लीतील महिपालपूर येथील हॉटेलमधील खोलीही तरुणीनेच बुक केली होती. मंगळवारी दोघेही हॉटेलमध्ये पोहोचले. काही वेळाने, तरुणीला वाटले की तो तरुण तिच्यासोबत काहीतरी चुकीचे करण्याचा प्रयत्न करत आहे, यावेळी दोघांमध्ये भांडण सुरू झाले. आरोपीने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ती तरुणी ओरडत हॉटेलच्या रिसेप्शनवर पोहोचली.
त्यानंतर दुसरा तरुण तिला लिफ्टमधून खोलीत घेऊन जात असताना, त्याने मुलीचा विनयभंग केला. सध्या, दिल्ली पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंग प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केली आहे .