शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या आमिषाने लुटणाऱ्या कॉल सेंटरचा पर्दाफाश, दिल्लीतून शिक्षकासह ५ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 06:11 IST

Crime News : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांशी संपर्क साधून नोंदणीसाठी १० रुपये भरण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून लाखो रुपये उकळणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटरचा पंतनगर पोलिसांनी पर्दाफाश केला.

मुंबई : नोकरीसंदर्भातील ऑनलाइन संकेतस्थळावर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांशी संपर्क साधून नोंदणीसाठी १० रुपये भरण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून लाखो रुपये उकळणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटरचा पंतनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. यात शिक्षकासह पाच आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली.कॉल सेंटर चालक राहुल तिलकराज (२१), शिक्षक आदित्य करण सिंग (३२), आशिष इक्बाल मोहम्मद हसन (२७), रवी भानुप्रताप होकला (२४) आणि देवेश कुमार वीरपाल सिंह (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत.घाटकोपर परिसरात राहणाऱ्या तरुणाला त्यांनी  सव्वाआठ लाखांना गंडा घातला हाेता. तरुणाच्या तक्रारीवरुन पंतनगर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्याच्या आधारे याचे दिल्ली कनेक्शन समोर आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांच्याकड़ून ८ हार्डडिस्क, २३ मोबाइल, ४७ सिम कार्ड, १२ डेबिट कार्ड, ११ पेटीएम कार्ड, ७ डोंगल ३ सीडी, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना तसेच १२ सिम कार्डचे केस कव्हर असा एकूण १ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. अटक आरोपींकडे अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिस