शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FB Live करत तरुणाने गळा कापला, फेसबुकने पोलिसांना फोन केला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 07:14 IST

Crime News : ऑगस्ट महिन्यात मीरारोड येथील शेफने आर्थिक चणचणीतून गळफास घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने फेसबुक लाईव्ह केल्याने फेसबुकने मुंबई पोलिसांना या विषयी माहिती दिली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांंनी त्याचे लोकेशन शोधून त्याला रुग्णालयात दाखल केले. 

ठळक मुद्देमॉर्फ केलेले फोटो पॉर्न वेबसाइटवर टाकले म्हणून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तिचे समुपदेशन करत प्राण वाचवले. सोशल मिडियावर एकाने कॉल गर्ल म्हणून मोबाईल क्रमांक टाकला म्हणून सांताक्रुझ येथील एका २१ वर्षीय तरुणीने मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मुंबई : धुळे परिसरात एकानर ब्लेडने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह केले. ही बाब लक्षात येताच, आयर्लंड येथील फेसबुक मुख्यालयातील कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांना कॉल करून माहिती दिली. यात, मुंबई पोलिसांनी तरुणाचे लोकेशन शोधून धुळे पोलिसांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवले.

सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजून १० मिनिटाने आयर्लंडच्या मुख्यालयातून फेसबुक प्रतिनीधीचा फोन आला. त्यांनी ज्ञानेश्वर पाटील (२३) नावाच्या तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला असून त्याला तात्काळ वाचविण्यासाठी विनंती केली.  त्यानुसार, पथकाने काम सुरु केले. २० मिनिटात तरुणाचा पत्ता सापडला. 

नाशिक जिल्ह्याचे पोलीस महानिरिक्षक डॉ. प्रताप दिघावकर आणि धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना या विषयी माहिती दिली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे तरुणाचे प्राण वाचले आहे. पाटील याची आई आई होम गार्डमध्ये असून धुळे पोलिसांसाठी काम करते. मुंबई पोलिसांनी तरुणाचे लोकेशन शोधून धुळे पोलिसांच्या मदतीने त्याचे प्राण वाचवले.

घटनाक्रम 

रात्री ८.१० - आयर्लंडच्या फेसबुक मुख्यालयातून कॉल 

रात्री ८.३० - तरुणाचा पत्ता शोधण्यास यश 

रात्री ९.०० - तरुणाला मदत 

यापूर्वीही वाचले चौघांचे प्राणऑगस्ट महिन्यात मीरारोड येथील शेफने आर्थिक चणचणीतून गळफास घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने फेसबुक लाईव्ह केल्याने फेसबुकने मुंबई पोलिसांना या विषयी माहिती दिली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांंनी त्याचे लोकेशन शोधून त्याला रुग्णालयात दाखल केले.  मॉर्फ केलेले फोटो पॉर्न वेबसाइटवर टाकले म्हणून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तिचे समुपदेशन करत प्राण वाचवले. 

सोशल मिडियावर एकाने कॉल गर्ल म्हणून मोबाईल क्रमांक टाकला म्हणून सांताक्रुझ येथील एका २१ वर्षीय तरुणीने मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीचा शोध घेत, तरुणीचे समुपदेशन केले. 

टॅग्स :FacebookफेसबुकSuicideआत्महत्याPoliceपोलिसDhuleधुळेcyber crimeसायबर क्राइमcommissionerआयुक्त