शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या निकालाआधीच पवारांकडून विधानसभेची तयारी सुरू?; भाजपच्या माजी आमदाराने घेतली भेट
2
देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल? काँग्रेसचे 'चाणक्य' डीके शिवकुमार यांनी केली ही भविष्यवाणी
3
"मोदींची ध्यानधारणा हीदेखील 'मूक पत्रकार परिषद'च होती"; संजय राऊतांचा आयोगावर पलटवार
4
कशी होते मतांची मोजणी? EVM-VVPAT स्लिप्सचे काय होते? जाणून घ्या संपूर्ण ABCD...
5
निकालाआधीच कोल्हापूरात विजयाची चर्चा, शाहू महाराजांचे झळकले पोस्टर
6
पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान
7
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा Exit Poll आला; इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, पाहा...
8
कार जाऊ द्या, आता बाईकमध्येही आली 'एअरबॅग'; होंडाच्या या दुचाकीचा किंमत किती माहित्येय?
9
भारतात आल्यावर पहिल्यांदा मृणाल दुसानीसने या पदार्थावर मारला ताव
10
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर काहीतरी भव्य दिव्य होणार; 10 हजार पाहुणे, स्थळ अन् तारीखही ठरली...
11
आरोग्यासाठी फायदेशीर असणारं लिंबू पाणी नेमकं कधी प्यावं?; जाणून घ्या, योग्य वेळ
12
शेअर बाजार 'रेकॉर्ड हाय'वर बंद; 'Modi Stocks'नं एकाच दिवसात केलं मालामाल, अदानींचे शेअर्स रॉकेट
13
लोकसभा निकालाआधीच बॉलिवूडमध्ये मोदींचा डंका! 'या' खानने BJP चं केलं अभिनंदन, म्हणाला...
14
'मोदी 3.0', Exit Poll वर पाकिस्तान, रशिया, चीन, सौदीसह जगभरातील मीडियाने काय म्हटले?
15
लोकसभेच्या निकालाआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश
16
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
17
धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?
18
दलजीतविरोधात निखिल पटेलची कायदेशीर कारवाई, पत्नीला थेट इशारा देत म्हणाला...
19
सरकार बनताच अॅक्शन मोडमध्ये येणार मोदी! बँकेसह या कंपनीतील हिस्सा विकण्याचा प्लान; शेअर्स बनले रॉकेट
20
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अंतरवाली सराटीतूनच विरोध, गावकऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

‘सत्य समोर येईल’म्हणत सीएने संपविले आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 10:05 AM

Crime News : मुलुंडमधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट चिराग विनोदराय वरैया (वय ४५) यांनी  इगतपुरी येथील हॉटेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली.

मुंबई : मुलुंडमधील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट चिराग विनोदराय वरैया (वय ४५) यांनी  इगतपुरी येथील हॉटेलमध्ये गळफास घेत आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्यांची चौकशी झाली. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असतानाच त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. नेमक्या कुणाच्या दबावाखाली त्यांनी टोकाचे पाऊल उचलले ? याबाबत तपास सुरू आहे. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी नोंद करत घटनास्थळावरून दोन पानी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. सुसाईट नोटमध्ये ‘बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप करत सत्य लवकरच समोर येईल,’ असे  नमूद केले आहे. मुलुंडमध्ये चिराग यांची ‘चिराग वरैया आणि कंपनी’ आहे. १० जानेवारी रोजी त्यांच्या विरोधात भांडुप पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याच गुन्ह्यात २६ जानेवारी रोजी ते भांडुप पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाले. मात्र, प्रकृती ठीक नसल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर, त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. शनिवारी ते चालकासोबत त्यांनी इगतपुरी येथील मित्राच्या मानस प्रोजेक्ट हॉटेल विवांतमध्ये थांबले. अटकपूर्व जामीन मिळेपर्यंत इगतपुरीला राहणार असल्याचे कुटुंबीयांना सांगून त्यांनी चालकासोबत इगतपुरी गाठली. पोलिसांना लोकेशन समजू नये  म्हणून त्यांचा मोबाइलही घरीच ठेवला होता. 

‘काही दिवस डिस्टर्ब करू नको’    शनिवारी दुपारी ३ वाजता हॉटेलवर पोोचताच त्यांनी चालकाला दोन हजार रुपये देत पुढील काही दिवस डिस्टर्ब करू नको, असे सांगितले.     या ठिकाणाबाबतही कुणाला माहिती देऊ नको. तसेच, सोमवारी मुंबईकडे निघायचे असल्याचे नमूद केले. त्यामुळे चालकाने या दिवसांत त्यांना कॉलही केला नाही.     सोमवारी निघायचे असल्याने चालकाने चिराग यांना कॉल करण्यास सुरुवात केली. दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद आला नाही. त्यांना संशय आल्याने बनावट चावीने प्रयत्न सुरू केले.     मात्र, आतून लॉक असल्याने दरवाजा उघडण्यास अडचणी आल्या. अखेर, इगतपुरी पोलिसांशी संपर्क साधताच त्यांनी खिडकी तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी