शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मित्राशी चॅटिंगमध्ये गुंग होती; पतीने हटकताच नाकाचा चावा घेत केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 22:19 IST

याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपत्नीने पतीस शिवीगाळ, ठोशा बुक्कायांनी मारहाण करत नाकावर चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याने तिचा लॅपटॉप पाहिला असता त्यात तीने मित्राशी चॅटींग केल्याचे दिसून आले.

मीरारोड - पत्नीला मित्राशी चॅटिंग का करतेस ? असे पतीने विचारल्याने त्याचा राग येऊन पत्नीने पतीस शिवीगाळ, ठोशा बुक्कायांनी मारहाण करत नाकावर चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती हा ३१ वर्षांचा असून वसई - नालासोपारा लिंक रस्त्यावर आपल्या आई वडिलांसोबत राहतो. तो खाजगी बँकेत नोकरीला असून २०११ साली भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या तरुणीशी (२७) आंतरधर्मिय प्रेमविवाह झाला होता.परंतु दोघांमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने वसई दिवाणी न्यायालयात दावा सुरु आहे. त्यामुळे पत्नी ही माहेरी आपल्या मुलीसह राहते.मुलीच्या शालेय क्रिडा स्पर्धा असल्याने पत्नीने फोन करुन पतीला कार्यक्रमास येण्याचे सांगितले होते. तो शनिवारी सकाळी मुलीच्या शाळेच्या कार्यक्रमास येऊ शकला नाही. परंतु दुपारी तो सासरी आला. पत्नीने न आल्याबद्दल विचारणा केली असता त्याने पुतणीची प्रकृती ठिक नसल्याने तिला सांताक्रुझ येथे रुग्णालयात दाखल केले असल्याने सकाळी येऊ शकलो नाही असे सांगितले.त्यावर ती रागाने बेडरूममध्ये गेली. त्याने तिचा लॅपटॉप पाहिला असता त्यात तीने मित्राशी चॅटींग केल्याचे दिसून आले. तू मित्राशी चॅटिंग का करतेस? अशी विचारणा त्याने केली. त्यावर रात्री बोलु असे सांगत तिने टाळले. शनिवारच्या मध्यरात्रीनंतर दिडच्या सुमारास पुन्हा त्याने मित्राशी चॅटिंग केल्यावरुन तिला जाब विचारला. त्यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु झाले. संतप्त पत्नीने पतीला शिवीगाळ करत ठोशा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच त्याच्या नाकाला चावा घेऊन जखमी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmira roadमीरा रोडPoliceपोलिस