शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

वाय-फाय दुरुस्तीच्या नावाखाली घरात शिरला चोर, ८० वर्षीय आजीची चार तोळ्यांची सोन्याची चेन लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 03:45 IST

Crime News : वाय-फाय दुरुस्तीच्या नावाखाली घरात चोर शिरल्याचा प्रकार भोईवाडा परिसरात समोर आला आहे. यात, ८० वर्षीय आजीला बोलण्यात गुंतवून तिची चार तोळ्यांची सोन्याची माळ घेऊन चोर पसार झाला आहे.

मुंबई : वाय-फाय दुरुस्तीच्या नावाखाली घरात चोर शिरल्याचा प्रकार भोईवाडा परिसरात समोर आला आहे. यात, ८० वर्षीय आजीला बोलण्यात गुंतवून तिची चार तोळ्यांची सोन्याची माळ घेऊन चोर पसार झाला आहे. या प्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध नुकताच फसवणुकीचा गुन्हा नोंद करत, भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.करी रोड येथील महादेव पालव मार्गावर ८० वर्षीय आजी ४० वर्षीय मुलगी आणि १० वर्षांच्या नातवासोबत राहण्यास आहे. त्यांच्या मुलीच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहे. त्यांची मुलगी कामावर गेल्यानंतर त्या नातवासोबत एकट्याच घरात असतात. याच दरम्यान ७ डिसेबर रोजी दुपारी चारच्या  सुमारास एक अनोळखी व्यक्ती वाय-फाय दुरुस्तीसाठी आला. त्यांनीही विश्वास ठेवून त्याला घरात प्रवेश दिला. पुढे वाय-फाय राउटर पाहत असताना, एक वायरचा तुकडा द्या, येथे लावायचा आहे, असे आजींना सांगितले. त्यांनी वायरचा तुकडा नसल्याचे सांगताच, ठगाने गळ्यातील सोनसाखळी काढून देण्यात सांगितले. आईनेही विश्वास ठेवून गळ्यातील सोन्याची माळ काढून दिली. माळ तेथे लावण्याचा बहाणा केला. पुढे थुंकण्याचे नाटक करत तो बाहेर गेला, तो परतलाच नाही, तसेच तो पळून गेल्याचे समजताच त्यांनी संबंधित ठगाचा शोध घेतला. मात्र, तो मिळून न आल्याने त्यांना धक्का बसला.  साडेचारच्या सुमारास मुलगी घरी परतताच तिला घडलेला घटनाक्रम सांगताच त्यांनाही धक्का बसला. अन्य नातेवाइकाच्या मदतीने त्यांनी भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, भोईवाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.आरोपीचा शोध सुरूअद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसून, अधिक तपास सुरू असल्याचे भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस विनोद कांबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई