शासकीय अधिकारी सांगून शिधावाटप दुकानदाराकडून पैसे उकळणारे बंटी बबलीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 09:11 PM2021-11-20T21:11:25+5:302021-11-20T21:12:10+5:30

Bunty Babli arrested : बबलीचे खरे नाव शबानाबानो बल्लूभाई सिद्दीकी ( ३०) रा. सांताक्रुज व प्रशांत गंगा विष्णू ( २७) रा . पिनाकोला टॉवर समोर , मीरारोड अशी असून ठाणे न्यायालयात शनिवारी हजर केले असता २३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 

Bunty Babli arrested for allegedly extorting money from ration shopkeepers | शासकीय अधिकारी सांगून शिधावाटप दुकानदाराकडून पैसे उकळणारे बंटी बबलीला अटक

शासकीय अधिकारी सांगून शिधावाटप दुकानदाराकडून पैसे उकळणारे बंटी बबलीला अटक

Next

मीरारोड - आपण नॅशनल ह्युमन राईटचे शासकीय अधिकारी आहोत, कार्यवाही टाळायची असेल तर पैसे द्या सांगून एका शिधावाटप दुकानदारा कडून २० हजारांची खंडणी उकळण्याऱ्या बंटी - बबली ला भाईंदरच्या नवघर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे . त्यांच्याकडे शहरातील शिधावाटप दुकानांची यादी तसेच ह्युमन राईट संस्थेचे ओळखपत्र, लेटरपॅड सापडले आहे . 

भाईंदर पूर्वेला रमेश वर्मा यांचे शिधावाटप व किराणा दुकान आहे. त्यांच्या दुकानावर ५ नोव्हेम्बर रोजी एक तरुणी व तरुण आले व आपण नेशनल ह्युमन राईटचे शासकीय अधिकारी असून तू लोकांना शिधावाटप कसे करतो ? ग्राहकांसाठीची तक्रार नोंदवही दाखव असे सांगितले .  तक्रा रनोंदवहीची तपासणी शिधावाटप अधिकारी करत असतात व हे दोघेही जण पहिल्यांदाच पहिले असल्याने वर्मा यांनी नोंद वही दाखवण्यास नकार दिला. 

त्यावर संतप्त दोघांनी तक्रार वही दाखवली नाही तर केस करेन असे धमकावले व ५० हजारांची मागणी केली . अखेर २० हजार रुपये वर्मा यांनी दिले . त्या नंतर उर्वरित ३० हजार रुपयांसाठी ते दोघे सतत कॉल करू लागले . वर्मा यांनी या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद देसाई , पोलीस निरीक्षक प्रकाश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगवान पाटील यांनी तपास सुरु केला. 

शुक्रवारी पोलिसांनी त्या बंटी - बबली ला अटक केली. त्यांच्या चौकशीत बबलीचे खरे नाव शबानाबानो बल्लूभाई सिद्दीकी ( ३०) रा. सांताक्रुज व प्रशांत गंगा विष्णू ( २७) रा . पिनाकोला टॉवर समोर , मीरारोड अशी असून ठाणे न्यायालयात शनिवारी हजर केले असता २३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. 

आरोपीं कडून केंद्र सरकार लिहलेले नेशनल ह्युमन राईटचे ओळखपत्र , लेटरहेड तसेच मीरा भाईंदर मधील शिधावाटप दुकानांची यादी मिळाल्याने ह्या दोघांनी आणखी काही दुकानदारां कडून खंडणी उकळली आहे का ? याचा तपास पोलीस करत आहेत . 

Web Title: Bunty Babli arrested for allegedly extorting money from ration shopkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.