भोंगळ कारभार! नावात गोंधळ झाल्याने ताप आलेल्या रुग्णाचं केलं ऑपरेशन, हलगर्जीपणामुळे झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 02:17 PM2021-10-22T14:17:51+5:302021-10-22T14:25:44+5:30

Crime News : रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आता रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे.

bulandshahar operation in confusion police postmortem patient death hospital seal | भोंगळ कारभार! नावात गोंधळ झाल्याने ताप आलेल्या रुग्णाचं केलं ऑपरेशन, हलगर्जीपणामुळे झाला मृत्यू

भोंगळ कारभार! नावात गोंधळ झाल्याने ताप आलेल्या रुग्णाचं केलं ऑपरेशन, हलगर्जीपणामुळे झाला मृत्यू

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. रुग्णालयाचा निष्काजीपणा कित्येकदा समोर आला आहे. अशीच भोंगळ कारभार दाखवणारी घटना आता समोर आली आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाचा आता रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. रुग्णालयाचा रुग्णांच्या नावामध्ये गोंधळ झाला आणि दुसऱ्या रुग्णाच्या ऐवजी साधा ताप आलेल्या रुग्णाचं ऑपरेशन केल्याची घटना समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये एका रुग्णाच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन रुग्णांच्या नावात गोंधळ झाल्याने डॉक्टरांनी ताप आलेल्या रुग्णाचं ऑपरेशन केलं. यानंतर त्या रुग्णांची प्रकृती अचानक बिघडली. प्रकृती गंभीर होऊन शेवटी रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातल्यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून अधिक तपास केला जात आहे. 

डॉक्टरांनी भलत्याच रुग्णाचं केलं ऑपरेशन अन्...

रुग्णाच्या मृत्यूनंतर हे रुग्णालय सीज करण्यात आलं असून उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली असून पोलीस देखील अधिक तपास करत आहेत. रुग्णाच्या पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 44 वर्षीय यूसुफ यांना ताप येत असल्याने उपचारासाठी बुलंदशहर जिल्हा मुख्यालयाजवळील सुधीर नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती ठीक होती. मात्र रात्री अचानक डॉक्टरांनी त्यांचं ऑपरेशन केलं.

रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य नर्सिंग स्टाफ गायब

सुरुवातीला गॉल ब्लाडरचं ऑपरेशन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. तर कुटुंबीयांनी शरीरातील अवयव काढून घेण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. दोन्ही रुग्णांचं नाव एकच असल्याने ऑपरेशन केल्याचं कारण रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलं आहे. ही घटना उजेडात आल्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी खूपच गोंधळ घातला. रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य नर्सिंग स्टाफ तेव्हापासून गायब झाले आहेत. आरोग्य विभागाने योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bulandshahar operation in confusion police postmortem patient death hospital seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.