शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरला पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी,पोलीस कर्मचार्‍यासह कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 13:44 IST

Pune Crime News : कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास सोने आणि चारचाकी गाडी देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे

पुणे - शुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीत पैसे गुंतवणुक केल्यास सोने आणि चारचाकी गाडी देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पैसे परत मागितल्यावर बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी पोलीस कर्मचार्‍याने दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पोलीस कर्मचार्‍यासह कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस कर्मचारी संतोष सावंत व त्याचा भाऊ व शुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीचा संचालक अभिजित धोंडिबा सावंत व इतर संचालक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत निखिल लक्ष्मणराव मिरगे (वय २९, रा. सरगम सोसायटी, नांदेड सिटी) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ ट्रेड बीज कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास दरमहा मोठ्या परतावा तसेच दुचाकी, चारचाकी गाड्या, सोने यासारखी मोठी बक्षिसे कंपनीतर्फे देण्याचे येतील असे अमिष दाखविण्यात आले. त्यावर विश्वास बसावा म्हणून वृत्तपत्र, युट्युब, फेसबुक यासारख्या माध्यमातून कंपनीविषयी आकर्षक जाहिराती दिल्या. फिर्यादी यांना कंपनीत ६३ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले.  सुरुवातीला ३ लाख ७८ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत कोणताही परतावा न देता गुंतवणुक केलेल्या रक्कमेचा अपहार केला.  फिर्यादी व त्यांचे दाजी हे रक्कम मागण्यासाठी अभिजित सावंत यांच्या नर्‍हे येथील कार्यालयात गेले असताना त्यांनी शिवीगाळ करत पिस्तुल दाखवून फिर्यादी यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा पोलीस खात्यातील भाऊ संतोष सावत यानेही फिर्यादी यांचे दाजी यांना बोलावून घेऊन शिवीगाळ करीत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.  गुंडामार्फत त्यांच्या मर्सिडीज गाडीचे वायपर व साईड मिरर तोडून नुकसान केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे