शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यातील फसवणूक प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, भाजपनेते रत्नाकर पवार यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 23:22 IST

कोंढव्यातील व्यावसायिकाची केली १ कोटी ६४ लाखांची फसवणूक

ठळक मुद्देतब्बल 6 महिन्यानंतर पोलिसांना अटक करण्यात यश

पुणे : भागीदारीत एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाने पैसे घेऊन ते प्रकल्पात न गुंतविता फसवणुक केल्या प्रकरणी कोंढवापोलिसांनी बांधकाम व्यावसायिक व भाजपनेते रत्नाकर पवार (रा. नाशिक) यांना अटक केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नाकर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला होता. पण न्यायालयाने तो फेटाळून लावल्यानंतर तब्बल ६ महिन्यांच्या प्रयत्नानंतर कोंढवा पोलिसांना त्यांना अटक करण्यात यश मिळाले आहे. लॉकडाऊननंतर सर्वोच्च न्यायालयाचे काम सुरु झाल्यानंतर २ जून रोजी तीन न्यायमुर्तींच्या खंडपीठाने रत्नाकर पवार यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोंढवा पोलीस त्यांचा शोध घेत होते़. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, रत्नाकर पवार आणि अशोक अहिरे यांना अटक करण्यात आली असून त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणी मोहद्दीस महंमद फारुख बखला (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. बखला यांची स्वत:ची टुर्स अँड ट्रव्हल्सची व ड्रीम होम कन्स्ट्रक्शन कंपनी आहे़ दस्तागीर पटेल हे भागीदार असून त्यांना फेबु्रवारी २०१७ अनिस मेमन यांनी इतर आरोपींशी ओळख करुन दिली. नाशिक येथील रत्नाकर पवार यांच्या मालकीच्या गिरणा इंफ्रा प्रोजेक्ट व इतर ठिकाणी पैसे गुंतविल्यास भरपूर फायदा मिळेल असे सांगितले. त्यांच्याबरोबर करार करुन त्यांची आरोपींनी आकर्षक मोबदल्याचा बहाणा करुन १ कोटी ६४ लाख १६ हजार ३८७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आह..या प्रकरणात कोंढवा पोलिसांनी याअगोदर काही जणांना अटक केली आहे.रत्नाकर पवार हे नाशिकमधील भाजपनेते आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करीत निवडणुक लढविली होती.

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाArrestअटकPoliceपोलिसfraudधोकेबाजी