अकाेला : एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील शिवर येथील रहिवासी असलेल्या पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन गुरुवारी रात्री उशिरा बेदम मारहाण केली़ या मारहाणीत पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला़. या घटनेची माहिती पतीनेच पाेलिसांना देऊन पत्नीला अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याचा बनाव केला; मात्र काही तासातच या प्रकरणातील खरा आराेपी तिचा पती असल्याचे समाेर आले आणि एमआयडीसी पाेलिसांनी त्याला अटक केली़.
शिवर येथील रहिवासी नीतेश ऊर्फ भारत सुखदेव खरात याने त्याची पत्नी ज्याेती मांडाेकार ऊर्फ ज्याेती नीतेश खरात हिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली़ गत अनेक दिवसांपासून ताे पत्नीला याच कारणावरून मारहाण करीत हाेता़. दरम्यान, गुरुवारी रात्री दाेघांमध्ये प्रचंड वाद झाल्यानंतर पती नीतेश खरात याने पत्नी ज्याेतीला लाथा-बुक्क्या तसेच काठीने जबर मारहाण केली़. या मारहाणीत पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला़ पत्नीचा मृतदेह पाहून घाबरलेल्या पतीने एमआयडीसी पाेलिसांना माहिती दिली़. मात्र ही मारहाण अज्ञात आराेपींनी केल्याचे त्याने पाेलिसांना सांगितले़ यावरून पाेलिसांनी परिसरातील तीन जणांना याच संशयावरून ताब्यात घेतले़. त्यांची कसून चाैकशी केली असता तीनही जणांचा या हत्येमध्ये काहीही सहभाग नसल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले़ . त्यानंतर तिचा पती नीतेश खरात याची चाैकशी सुरू केली असता त्याने पाेलिसांसमाेर उडवाउडवीचे उत्तर दिली़. तसेच काही उत्तर संशयास्पद असल्याने नीतेशनेच पत्नीची हत्या केल्याचे पाेलिसांच्या लक्षात आले़. यावरून काही तासातच या हत्याकांडातील खऱ्या आराेपीचा शाेध घेण्यात शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांना व त्यांच्या पथकाला यश आले. पत्नीची हत्या करणारा आराेपी नीतेश खरात याला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले़. न्यायालयाने आराेपीस पाेलिस काेठडी सुनावली़ या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. या हत्या प्रकरणातील आराेपीचा उलगडा पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने व एमआयडीसी पाेलिसांनी केला़.
आराेपीला हाेत्या दाेन पत्नी
आराेपी नीतेश खरात याला पहिली पत्नी असून तिच्यापासून त्याला चार अपत्य आहेत़ ; तर दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी असून दुसरी पत्नी त्याच्यासाेबत राहत हाेती़; मात्र तिच्यावरही चारित्र्याचा संशय घेत त्याने साेबत असलेल्या दुसऱ्या पत्नीची हत्या केली़. तर पहिली पत्नी माहेरी राहत असल्याची माहिती आहे़ आता दुसऱ्या पत्नीच्या हत्येनंतर दाेन्ही मुले उघड्यावर आली आहेत़.
हत्येचा उलगडा अन् आराेपी अटकेत
पत्नीची हत्या अज्ञात मारेकऱ्यांनी केल्याचा बनाव मारेकरी पती नीतेश खरात याने केला़; मात्र पाेलिसांनी दुसऱ्या पत्नीचे माहेर असलेल्या केळीवेळी येथून माहिती घेतली असता नीतेश हा ज्याेतीला नेहमीच मारहाण करीत असल्याची माहिती समाेर आली़. यावरून पाेलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता पाेलिसी खाक्या दाखविताच आराेपीने पत्नीच्या हत्येची कबुली दिली़.