शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दगडाने ठेचून तडीपार गुंडाची निर्घृण हत्या; दोन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 19:44 IST

Murder Case : मृत अशोक सरदार याच्यावर खून व इतर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ठळक मुद्दे पोलीससूत्रांनुसार, अशोक उत्तम सरदार (३८, रा. जेवडनगर) असे मृताचे नाव आहे. अतुल तुपाळे (२९) व राजेश थोरात (३३, दोन्ही रा. जेवडनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

अमरावती : महिनाभरापूर्वीच्या किरकोळ मारहाणीचा वचपा काढण्याच्या उद्देशाने दोघांनी तडीपार गुंडाला दगडाने ठेचले. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छत्री तलावाजवळ शुक्रवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलीससूत्रांनुसार, अशोक उत्तम सरदार (३८, रा. जेवडनगर) असे मृताचे नाव आहे. अतुल तुपाळे (२९) व राजेश थोरात (३३, दोन्ही रा. जेवडनगर) अशी आरोपींची नावे आहेत. मृत अशोक सरदार याने आरोपी अतुल तुपाळेला किरकोळ वादातून मारहाण केली होती. त्यानंतर तो वाद शमला होता. शुक्रवारी अशोक हा मित्रांसोबत छत्रीतलाव परिसरात जेवणाकरिता गेला. आधीच तेथील गार्डनमध्ये असलेल्या अतुल व राजेश यांची त्याच्याशी नजरानजर झाली. त्यानंतर अशोक तेथून पुढे गेला. काही वेळाने अतुल व राजेश हे अशोक जेवण करीत असलेल्या ठिकाणी पोहचले. तेथे त्याच्याशी वाद करून डोक्याला दगड मारून अशोकची हत्या केली.

या घटनेने शहरात खळबळ उडाली. राजापेठ ठाणे हद्दीत खुनाची ही अलीकडच्या काळातील दुसरी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता इर्विन रुग्णालयातील शवागारात पाठविला. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.बॉक्स

आरोपी, मृताची गुन्हेगारी पार्श्वभूमीमृत अशोक सरदार याच्यावर खून व इतर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. अशोकचा खून करणारे आरोपी अतुल तुपाळे, राजेश थोरात यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३२४ व इतर किरकोळ गुन्हे दाखल असल्याचे राजापेठ पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती