शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या चारित्र्यावर भावाचा संशय, बेदम मारहाण करून मृतदेह फेकला तलावात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 20:13 IST

Murder Case : हत्येप्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण मोहम्मदपूर खाला पोलीस स्टेशनचे आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. बहिणीच्या वागण्यावर संशय आल्याने भावाला मुला-मुलींना भेटणे आवडत नसल्यामुळे लाठ्या-काठ्यांनी मारहाण करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह तलावात फेकून दिला. हत्येप्रकरणी आरोपी भावाला पोलिसांनीअटक केली आहे. हे प्रकरण मोहम्मदपूर खाला पोलीस स्टेशनचे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी मोहरम अली यांनी मोहम्मदपूरखाला पोलिस स्टेशनला माहिती दिली की, कोणीतरी त्याच्या २२ वर्षीय मुलीला घेऊन गेले आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, त्यानंतर हे प्रकरण धक्कादायक ठरले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि सीओ फतेहपूर यांच्या नेतृत्वाखाली, Squad  टीम आणि मोहम्मदपूरखाला पोलिस स्टेशन यांनी मॅन्युअल गुप्तचरांच्या आधारे मृताचा भाऊ इसरार याला अटक केली. यानंतर घटनेत वापरलेली काठी आणि सायकलही जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी इसरारची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, त्याची बहीण अनेकदा घरी राहत नाही, त्यामुळे रागाने बहिणीला शिवीगाळ करून काठीने मारहाण करायला सुरुवात केली, त्यानंतर तिच्या डोक्याला मार लागला आणि तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, इसरारने फेकून देण्यासाठी झोपडीत मृतदेह लपवला आणि बेपत्ता बहिणीबद्दल घरी सांगितले.'सायकलवरून मृतदेह तलावात फेकून दिला होता'त्यानंतर त्याचा कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर संधी पाहून 25-26 जानेवारी रोजी रात्री घरातील लोक झोपले असताना इसरारने बहिणीचा मृतदेह सायकलवरून नेऊन तलावात फेकून दिला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिचा दुपट्टा आणि चप्पल तलावाच्या काठावर ठेवली होती. पोलिस अधीक्षक अनुराग वत्स यांनी सांगितले की, भाऊ इसरार बहिणीच्या वागण्याने संतापला होता. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला कारागृहात पाठवण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूArrestअटक