आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाचा बहिणीवर गोळीबार; आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 00:10 IST2019-12-17T00:10:19+5:302019-12-17T00:10:37+5:30

मुंबई -  कांदिवली विभागात एका तरुणीने यूपीमध्ये पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भावाने बहिणीची हत्या करण्यासाठी तिच्यावर आणि तिच्या ...

Brother's sister shot out of anger over inter-caste marriage; Suicide | आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाचा बहिणीवर गोळीबार; आत्महत्या

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून भावाचा बहिणीवर गोळीबार; आत्महत्या

मुंबई -  कांदिवली विभागात एका तरुणीने यूपीमध्ये पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भावाने बहिणीची हत्या करण्यासाठी तिच्यावर आणि तिच्या पतीवर गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री समोर आली. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. 


बटुकेश्वर त्रैलोकीनाथ तिवारी(३४) असे या भावाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी रोहित सिंग या परजातीच्या मुलाबरोबर लग्न केल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे. सोमवारी बटुकेश्वर तिच्या बहिणीच्या घरी आला होता. त्या वेळी त्याने बहिणीवर आणि तिच्या पतीवर गोळीबार केला. परंतु यातून त्याची बहीण आणि पती घराबाहेर पळल्याने वाचले. परंतु त्यानंतर बटुकेश्वर याने  स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच समता नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि रात्री उशिरापर्यंत त्याच्या बहिणीचा जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

युपीच्या चंदवली मधील बटुकेश्वर रहिवासी आहे. त्याचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णलयात पाठवला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Brother's sister shot out of anger over inter-caste marriage; Suicide