भयानक! बहिणीला प्रियकरासोबत स्कूटरवर पाहून भाऊ संतापला; मिनी ट्रकनं दिली जोरदार धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 14:43 IST2022-04-20T14:37:45+5:302022-04-20T14:43:22+5:30
अंगावर काटा आणणारी घटना सीसीटीव्हीत कैद; बहिण आणि तिच्या प्रियकराला चिरडून मारण्याचा प्रयत्न

भयानक! बहिणीला प्रियकरासोबत स्कूटरवर पाहून भाऊ संतापला; मिनी ट्रकनं दिली जोरदार धडक
भोपाळ: मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ऑनर किलिंगचा प्रयत्न झाला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बहिणीला प्रियकरासोबत स्कूटरवर फिरताना पाहून संतापलेल्या भावानं भररस्त्यात त्यांची हत्या घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवानं दोघांचा जीव वाचला.
भावानं बहिण आणि तिच्या प्रियकराच्या हत्येचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. बहिण तिच्या प्रियकरासह दुचाकीवरून जात असताना भाऊ मागून मिनी ट्रक घेऊन आला. त्यानं जाणूनबुजून दुचाकीला धडक दिली. अचानक जोरदार धडक बसल्यानं प्रेमी युगुल रस्त्यावर पडलं. त्यानंतर भाऊ मिनी ट्रकच्या चालकासह खाली उतरला. दोघांनी प्रियकराला मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ आणि मिनी ट्रकच्या चालकाला अटक केली. घटना सोमवार संध्याकाळची असल्याचं पोलिसांनी सांगितलं. एक तरुण त्याच्या प्रेयसीसोबत स्कूटरवरून फिरत होता. तरुणीच्या भावानं दोघांना पाहिलं. त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणानं दुचाकीचा वेग वाढवला. मिनी ट्रकनं दोघांचा पाठलाग केला आणि त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली, अशी माहिती अयोध्या नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी निलेश अवस्थी यांनी दिली.