अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 10:15 PM2021-09-26T22:15:59+5:302021-09-26T22:17:03+5:30

Drugs case : याआधीही एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती.

The brother of Arjun Rampal's girlfriend was handcuffed by the NCB in Goa | अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या

अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबीने गोव्यातून ठोकल्या बेड्या

Next
ठळक मुद्दे एनसीबीने गेल्या वर्षी अगिसिलाओसकडून चरस आणि अल्प्राझोलमच्या गोळ्याही जप्त केल्या होत्या

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची प्रेयसी गर्लफ्रेंड गैब्रिएलाच्या भावाला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. अगिसिलाओसला (Agisialos Demetriades) संयुक्त कारवाई केल्यानंतर शनिवारी मुंबई आणि गोव्याच्या NCB ने गोव्यातून अटक केली. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटनुसार, केंद्रीय एजन्सीने त्यांच्याकडून चरसही जप्त केला आहे. याआधीही एनसीबीने ऑक्टोबर 2020 मध्ये त्याला बॉलिवूड ड्रग प्रकरणात अटक केली होती. अगिसिलाओस हा दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे.एनसीबीने गेल्या वर्षी अगिसिलाओसकडून चरस आणि अल्प्राझोलमच्या गोळ्याही जप्त केल्या होत्या. ड्रग पेडलर्सच्या अटकेनंतर,  अगिसिलाओस डेमेट्रीएड्सच्या ड्रग व्यवहारात सहभागी झाल्याचे प्रकरण समोर आले. एनसीबीने ड्रग्स प्रकरणी गेल्या वर्षी अगिसियालोसच्या आधी २२ लोकांना अटक केली होती. या अटक ड्रग्स तस्करांशी या आरोपीचा संबंध आढळून आल्याने त्याला एनसीबीने अटक केली आहे. 

Web Title: The brother of Arjun Rampal's girlfriend was handcuffed by the NCB in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app