शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कुलूप तोडून हॉटेलात शिरला; चोरटा, रोकड, सीपीयू घेऊन पसार...; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

By सागर दुबे | Updated: March 27, 2023 21:01 IST

मध्यरात्री घडलेली ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव : ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगरातल्या हॉटेल मितवाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्याने काउंटरमधून १७ हजार रूपयांच्या रोकडसह २ हजार रूपये किंमतीचा सीपीयू चोरून नेल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. मध्यरात्री घडलेली ही संपूर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठेतील चेतन अनिल वाणी यांच्या मालकीची ममुराबाद रस्त्यावरील प्रजापत नगर येथे मितवा नावाने हॉटेल आहे. रविवारी रात्री दहा वाजता नेहमीप्रमाणे वाणी हे हॉटेल बंद करुन घरी निघून केले. मध्यरात्री एक चोरटा हॉटेलचे शटरचे कुलूप तोडून आत शिरला. त्यानंतर काउंटरवरील गल्ल्यातून रोकड आणि सीपीयू घेवून पसार झाला. सोमवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास वाणी हे हॉटेल उघडण्यासाठी आले, त्यावेळी त्यांना हॉटेलचे शटर एका बाजूने थोडे उचकलेल्या अवस्थेत दिसले. हॉटेलात प्रवेश केल्यानंतर त्यांना काऊंटरमधील चिल्लर व चाव्या या काऊंटरवर दिसल्या. त्यांनी लागलीच गल्ल्याची तपासणी केली. त्यावेळी त्यातील १७ हजारांची रोकड व हॉटेलमधील सीपीयू गायब झालेला दिसून आला.  

चोरटा सीसीटीव्ही कॅमे-यात कैदचोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.  तसेच श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. हॉटेलातून चोरट्याच्या हाताचे ठसे घेतले असून त्या आधारावर पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एक चोरटा हातात बॅटरी घेवून हॉटेलमध्ये शिरताना दिसून आला. त्याने हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड लांबवून तो सुमारे पंधरा ते वीस मिनिट हॉटेलच्या आवारात फिरत होता. त्यानंतर चोरटा दुचाकीने ममुराबाद गावाच्या दिशेने गेल्याची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalgaonजळगाव