शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 17:53 IST

लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनी एक नवविवाहित वधू तिच्या पतीसोबत शॉपिंग करण्यासाठी गेली आणि संधीचा फायदा घेत फरार झाली.

उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनी एक नवविवाहित वधू तिच्या पतीसोबत शॉपिंग करण्यासाठी गेली आणि संधीचा फायदा घेत फरार झाली. ही घटना जिल्ह्यातील मुगलसराई कोतवाली भागात घडली आहे. पती शमशेर चौहान याने पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शमशेर चौहान हा सैदपुरा गावचा रहिवासी आहे. ४ जून रोजी त्याचं लग्न मवाई खुर्द गावातील रहिवासी खुशीशी झालं होतं. लग्नानंतर घरात आनंदाचे वातावरण होतं, परंतु १४ जून रोजी सर्व काही बदललं. शमशेरने सांगितलं की, त्या दिवशी पत्नीने डोकं दुखत असून तिला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितलं. औषध घेतल्यानंतर खुशीने शॉपिंगला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती तिच्या पतीसोबत पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर बाजारात गेली.

बाजारात खरेदी केल्यानंतर दोघेही काली माता मंदिराजवळील एका रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी गेले. रेस्टॉरंटमध्ये समोसे ऑर्डर केल्यानंतर, खुशीने तिला वॉशरूममध्ये जायचं असल्याचं सांगितलं आणि वरच्या मजल्यावर गेली. बराच वेळ ती परत आली नाही तेव्हा शमशेरने चौकशी केली आणि तिला शोधण्यासाठी रेस्टॉरंटच्या तिसऱ्या मजल्यावर गेला, परंतु खुशी कुठेही सापडली नाही. 

सगळीकडे शोधल्यानंतरही जेव्हा त्याला त्याची पत्नी सापडली नाही तेव्हा शमशेर घरी परतला आणि त्याने आपल्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. कुटुंबासह, शमशेरने पोलीस ठाण्यात जाऊन बेपत्ता पत्नीची तक्रार दाखल केली. खुशी तिच्या माहेरीही पोहोचली नसल्याचंही समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :marriageलग्नUttar Pradeshउत्तर प्रदेश