शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशी वरात घेऊन आलाच नाही नवरदेव, कारण समोर आल्यावर सगळेच झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 11:16 IST

Madhya Pradesh Crime News : संतापलेले नवरीकडील लोक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर जे समोर आलं ते फारच हैराण करणांर होतं.

Madhya Pradesh Crime News : मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये लग्नाच्या दिवशी नवरी नवरदेवाची वाट बघत होती. पण नवरदेव वरातच घेऊन पोहोचला नाही. अशात संतापलेले नवरीकडील लोक तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यानंतर जे समोर आलं ते फारच हैराण करणांर होतं.

पोलिसांनी सांगितलं की, नवरदेवाचं दुसऱ्याच तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. जेव्हा तिला समजलं की, तिचा प्रियकर दुसऱ्याच तरूणीसोबत लग्न करत आहे तर तिने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. ज्यामुळे नवरदेव वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचला नाही.

सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही घटना छिंदवाडाच्या परासियातील न्यूटनमधील आहे. इथे एका तरूणीचं लग्न बैतूल पोलीस स्टेशनमध्ये तैनात कॉन्स्टेबल सोनू सलकियासोबत ठरलं होतं. तो शिवपुरीचा राहणारा आहे. रविवारी दोघांचं लग्न होणार होतं. लग्नाच्या दिवशी नवरीकडील लोक वरातीची वाट बघत होते, पण वरात आलीच नाही. त्यांना वाटलं की, काही कारणाने वरात लेट झाली असेल. बराचवेळ वाट बघूनही वरात आलीच नाही.

वरातच आली नसल्याने लग्नासाठी आलेले पाहुणे घरी परत गेले. या गोष्टीमुळे नाराज नवरीकडील लोक पोलीस स्टेशनमध्ये गेले. त्यांनी नवरदेवाकडील लोकांविरोधात तक्रार दाखल केली. तिथे त्यांना समजलं की, नवरदेवाविरोधात आधीच एक तक्रार दाखल आहे जी त्याच्या प्रेयसीने केली आहे.

पोलीस अधिकारी महेंद्र भगत यांनी सांगितलं की, सोनू सलकिया बैतूल पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल म्हणून तैनात आहे. ज्याचं एका तरूणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. ती सुद्धा बैतूलची राहणारी आहे. सोनूच्या प्रेयसीला जेव्हा हे समजलं की, तो दुसऱ्या तरूणीसोबत लग्न करत आहे. त्यामुळे तिने त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. ज्यामुळे सोनू वरात घेऊन नवरीच्या घरी गेलाच नाही.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी