शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणच शेत खातंय! लाचखोर वाहतूक पोलीस एसीबीच्या जाळयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 22:11 IST

मुंब्रा वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी हा टेम्पो डायघर वाहतूक पोलिसांनी जप्त केला होता. टेम्पो सोडण्यासाठी मुंब्रा वाहतूक उपविभागात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई मुंडे याने 11 सप्टेंबर 2019 रोजी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

ठाणे - जप्तीमधील टेम्पो सोडविण्यासाठी दहा हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी अंगद मुरलीधर मुंडे (31) या मुंब्रा वाहतूक शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये हा प्रकार आढळल्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यातील संबंधित तक्रारदार यांच्या मुलाच्या नावाने एक टेम्पो आहे. वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी हा टेम्पो डायघर वाहतूक पोलिसांनी जप्त केला होता. दरम्यान, हा टेम्पो सोडण्यासाठी मुंब्रा वाहतूक उपविभागात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई मुंडे याने 11 सप्टेंबर 2019 रोजी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात ठाणे लाचलुचपतविरोधी पथकाकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर एसीबी पथकाने 14 सप्टेंबर रोजी याप्रकरणी पडताळणी केली. यात तथ्यता आढळल्याने पोलीस निरीक्षक सुषमा पाटील यांच्या पथकाने 11 ऑक्टोबर रोजी मुंढे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसthaneठाणे