शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
5
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
6
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
7
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
8
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
9
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
10
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
11
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
12
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
13
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
14
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
15
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
16
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
18
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
19
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
20
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक

आजारी आरोपीला भेटण्यासाठी मागितली चक्क २० हजारांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 09:04 IST

तुरुंगात असलेले कैदी, आरोपींना भेटण्यासाठी कारागृह पोलीस पैसे घेत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. पण, नातेवाईकांच्या भेटीसाठी आसुरलेले लोक त्यांची मागणी निमुटपणे मान्य करुन पैसे देतात.

पुणे  - तुरुंगात असलेले कैदी, आरोपींना भेटण्यासाठी कारागृह पोलीस पैसे घेत असल्याचे नेहमीच सांगितले जाते. पण, नातेवाईकांच्या भेटीसाठी आसुरलेले लोक त्यांची मागणी निमुटपणे मान्य करुन पैसे देतात. पण, त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलिसांनी कडी केली. आजारी असल्याने ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असलेल्या मुलाला भेटू देण्यासाठी दोघा पोलिसांनी वडिलांकडे चक्क २० हजार रुपयांची लाच मागितली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री सापळा रचून या दोघा पोलिसांना रंगेहाथ पकडले. स्वप्नील भीमराव भद्रे (वय ३०, रा़ विश्रांतवाडी पोलीस लाईन), अनोश आगस्टिन गायकवाड (वय २४, रा़ कनक अपार्टमेंट, दौंड) अशी पोलीस मुख्यालयाच्या पोलीस शिपायांची नावे आहेत.याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा मुलगा शुक्रराज हा येरवडा तुरुंगात कोठडीमध्ये आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तुुरुंगात उपोषण सुरु केले आहे. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या बंदोबस्तासाठी स्वप्नील भद्रे आणि अनोश सबस्तीन यांची नेमणूक केली आहे. त्याच्या वडिलांनी मुलाला भेटू देण्यासाठी विनंती केली. तेव्हा त्यांनी मुलाला भेटायचे असेल तर २० हजार रुपयांची मागणी केली.  त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर शुक्रवारी रात्री ससून रुग्णालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून २० हजार रुपये घेताना स्वप्नील भद्रे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याला मदत व प्रोत्साहन दिले म्हणून अनोश गायकवाड यालाही पकडण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे