शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

पोलिसाला मारहाण करून गालाचा चावा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 6:42 AM

महिला पोलिसाला मारहाण करून गालाचा कडकडून चावा घेतल्याचा प्रकार अंबोलीत घडला. पोलिसाच्या गालाला मोठी दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरूआहेत. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी निशा नीलेश परबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - महिला पोलिसाला मारहाण करून गालाचा कडकडून चावा घेतल्याचा प्रकार अंबोलीत घडला. पोलिसाच्या गालाला मोठी दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार सुरूआहेत. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी निशा नीलेश परबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अंबोली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई असलेल्या अनसूया जाधव रात्री त्यांच्या सहकारी संगीता कांबळे (४६)सोबत गस्तीवर होत्या. दरम्यान अंधेरी महाकाली रोड परिसरातील हॉटेल बंद झाले असतानाही एक महिला तेथे उभी होती. कांबळे यांनी तिला हटकले आणि सुरक्षेच्या कारणास्तव तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र महिलेला राग आल्याने तिने वाद घालण्यास सुरुवात केली.जाधव यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता, त्या महिलेने जाधव यांना मारहाण सुरू केली आणि त्यांना वर्दी उतरवून व बघून घेण्याची धमकी दिली. जाधव यांचे समजावणे सुरू असतानाच महिलेने त्यांना मारहाण करत जाधव यांच्या गालाचा कडकडून चावा घेतला. गालाला गंभीर जखम झाल्याने त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, मारहाण करणाऱ्या महिलेने तेथून पळ काढला.कांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी निशा नीलेश परबविरुद्ध गुन्हा दाखल केला. अद्याप कुणाला अटक केली नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांनी दिली. जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबई